Vastu Tips 
संस्कृती

Vastu Tips : घराच्या भिंतींमध्ये या गोष्टी दिसल्या तर दुर्लक्ष करू नका

वास्तूशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे माणसांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात.

सकाळ डिजिटल टीम

कोणत्या ठिकाणी काय, कसे ठेवावे याबरोबरच भिंतींविषयी सुध्दा बऱ्याच गोष्टी वास्तूशास्त्रात सांगितल्या आहेत.

हायलाइट्स

घराच्या भिंती खराब असल्याने नकारात्मकता वाढते.

घरात फिकट व चांगले रंग लावायला हवेत.

वास्तूशास्त्रात घरात ठेवली जाणरी प्रत्येक वस्तूची दशा आणि दिशा कशी असावी या विषयी सांगितले आहे.

याचे फार महत्व आहे. असे मानले जाते की घरातल्या वस्तू वास्तूशास्त्रानुसार ठेवल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

जशा घरातल्या वस्तू आपल्या वास्तूवर प्रभाव पाडतात तसाच भिंती व दरवाजे घरातल्या माणसांवर वाईट परीणाम करतात. असे मानले जाते की काही संकेत हे घराच्या भिंतींशी निगडीत आहेत. ज्यामुळे घरातील सुख शांतीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून घराच्या भिंती कायम सुस्थितीत व सुसज्ज असाव्यात.

कोणत्या दिशेला भिंत असावी

१) वास्तूशास्त्रात भिंत कोणत्या दिशेला हवी याचा उल्लेख सापडतो. घर बनवताना भिंतींची उंची दरवाज्यापेक्षा तीन चतुर्थांश अधिक असायला हवी.

२) वास्तूशास्त्रानुसार घराच्या पश्चिम व दक्षिण दिशेच्या भिंतींची उंची उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतींच्या तुलनेत कमीतकमी ३० सेंटीमीटर अधिक असायला हवी.

घराच्या भिंती ठेवा स्वच्छ

वास्तूशास्त्रानुसार घराच्या भिंती नेहमी स्वच्छ ठेवायला हव्यात. असे मानले जाते की, जाळे लागलेल्या भिंती, धुळ जमलेल्या मळकट भिंती नकारात्मक ऊर्जा वाढवतात. भिंतींवरील जाळी घरात तणावपुर्ण व निराशात्मक वातावरण निर्माण करतात. तसेच भिंतींवर कसलेच डाग नसावे यामुळे घरात दरीद्री वाढते.

भिंतीवरील रंगांचे महत्व

वास्तूशास्त्रानुसार घरातील भिंतींच्या रंगांचे विशेष महत्व आहे. त्यामुळे भिंतींवरील रंगांचे पोपडे धरलेले नसावे. यामुळे घरात अनेक आजारपण येतात.

याबरोबर घरातील भिंतींवर नेव्ही ब्ल्यू किंवा काळा रंग लावू नये. घराला आतल्या बाजूने कायम फिकट आणि सुंदर रंग लावावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील सदस्यांमध्ये प्रेम व सद्भावना वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT