Chandra Grahan 2023 esakal
संस्कृती

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणावेळी या चुका टाळा, नाहीतर आयुष्यात उठेल संकटांचं वादळ

यंदाचं पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार नसलं तरी त्याचा प्रभाव सगळीकडे दिसून येईल. तेव्हा या काही चुका चुकूनही करू नका

सकाळ डिजिटल टीम

Chandra Grahan 2023 : वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ५ मे रोजी असणार आहे. तेव्हा या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. असे न केल्यास तुम्हाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यंदाचं पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार नसलं तरी त्याचा प्रभाव सगळीकडे दिसून येईल. तेव्हा या काही चुका चुकूनही करू नका.

चंद्रग्रहणाच्या वेळी जपून राहा

या वर्षी चंद्रग्रहणाच्या काळात लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे शास्त्राच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशेषत: ज्या महिला गर्भवती आहेत. गरोदर महिलांनी ग्रहण काळात घराबाहेर पडू नये आणि ग्रहण काळात जेवण करू नये. ग्रहण काळात पूजेपासून दूर राहा. याशिवाय भाजीपाला कापण्यासाठी चाकू, सूरी या साधनांचा वापर करू नये.

ही कामं करणे टाळा

शास्त्र तज्ज्ञांच्या मते चंद्रग्रहणात तुम्ही कोणावर राग काढल्यास पुढले १५ दिवस तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकतात. चंद्रग्रहणाच्या वेळी चुकूनही एकांत ठिकाणी किंवा स्मशानभूमीत जाऊ नका. ग्रहणकाळात पती पत्नीने शारीरिक संबंधांपासून दूर राहावे.

ग्रहण काळ

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी होणार असल्याचे ज्योतिषी सांगतात. रात्री 8:44 वाजून सुरु होणार असून ते मध्यरात्री 1:20 पर्यंत राहील. ग्रहणाच्या दिवशी गंगेत स्नान करून गोरगरिबांना दान करावे लागते. ग्रहण संपल्यानंतर घराची शुद्धी करा आणि गरजूंना कपडे दान करा. (Lunar Eclipse)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

SCROLL FOR NEXT