Lucky zodiac signs today as per Chandra Mangal Yog: आज चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार असून, याच राशीत मंगळही उपस्थित असल्यामुळे चंद्र-मंगळ योगाची निर्मिती होईल. यामुळे वृषभ, कर्क आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष लाभदायक ठरेल. याशिवाय शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीचे भविष्य.
आज मेष राशीच्या लोकांनी आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्यात. व्यावसायिक योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. नोकरीत दिलेले कार्य काळजीपूर्वक पूर्ण करा. वेळेचा सदुपयोग करा. कौटुंबिक जीवनात संयम ठेवा आणि मुलांच्या भावना समजून घ्या.
आज वृषभ राशीच्या जातकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. उत्पन्नवाढ होईल आणि खर्चावर नियंत्रण राहील. कुटुंबीयांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. नोकरीच्या शोधात असलेल्यांना संधी मिळू शकते.
आज तुम्हाला एखादा मित्र गुंतवणुकीसाठी सुचवू शकतो – त्यावर विचार करा. सासरकडील वाद मिटू शकतात. जुन्या चुकांची कबुली देण्याची वेळ येऊ शकते. शांत राहणे महत्त्वाचे आहे.
कर्क राशीच्या लोकांची तब्येत सुधारेल. कामाच्या ठिकाणी अडचणी असल्यास वरिष्ठांशी संवाद साधा. कर्ज दिले असल्यास आज परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात जबाबदारीने वागा.
सिंह राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असेल. परंतु जुन्या अडचणी दूर होतील. व्यवसायात नवीन भागीदार घेण्यापूर्वी विचार करा. भावंडांकडून मदत घेण्याची गरज भासेल. संयम ठेवा.
आज कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन व मनपसंत बदली मिळू शकते. घरातील तणाव संवादाने सुटेल. प्रेमसंबंधांमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, सावध राहा.
आज तूळ राशीच्या लोकांची धावपळ वाढेल. घरात एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. वैवाहिक जीवनात समाधान मिळेल. आर्थिक निर्णय घेताना आई-वडिलांचा सल्ला घ्या.
विवाहित न झालेल्यांना चांगले स्थळ मिळू शकते. नवीन वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. जोडीदारासाठी एखादे छोटे गिफ्ट आनंद देईल.
धनु राशीच्या लोकांना सासरकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. परदेश शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना संधी मिळेल. नवीन व्यावसायिक योजना सुरू करता येतील. उधार देताना विचार करा.
मकर राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत दक्षता घ्यावी. कामाचा ताण जाणवू शकतो, पण टीमच्या मदतीने सर्व पूर्ण होईल. जुन्या मित्राची भेट लाभदायक ठरेल.
कुंभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम आहे. उत्पन्नाच्या एकापेक्षा अधिक स्रोतांमधून फायदा होईल. नवीन आर्थिक योजना आखू शकता. मुलांसोबत वेळ घालवल्यास समाधान मिळेल.
कामाच्या ठिकाणी सकारात्मक विचार ठेवा. नोकरीत बढती मिळू शकते. विरोधक तुमची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करतील, पण आत्मविश्वासाने पुढे चला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.