Yearly Horoscope 2022
Yearly Horoscope 2022 sakal
संस्कृती

वार्षिक राशिभविष्य | मिथुन - मानसन्मान वाढेल; भरभराटही होईल

सकाळ वृत्तसेवा

कष्टाला बुद्धी आणि चातुर्याची जोड दिल्यास माणूस काहीही करू शकतो, हे शिकवणारी ही रास आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे गीत या राशीच्या लोकांना तंतोतंत लागू पडते. जर या राशीच्या लोकांनी व्यवहारीदृष्टी ठेवून त्याप्रमाणे काम केल्यास जीवनात ते निश्चितच यशस्वी होतील. तसेच, कुणाच्या पायाही पडावे लागणार नाही. या राशीत शरीर सामर्थ्यापेक्षा बौद्धिक सामर्थ्य जास्त असते.

अत्यंत हळव्या मनाची, भित्र्या स्वभावाची, आत्मविश्वास कमी असलेली, पण बुद्धीच्या जोरावर जगणारी अशी ही मिथुन रास. बुद्धिमत्तेचे अफाट भांडार म्हणजे मिथुन रास. जी गोष्ट इतरांना बराच काळ समजत नाही, ती या राशीच्या लोकांना पटकन समजते. मुळातच या राशीवर विष्णूकृपा असल्याने कोणतीही संकटे आली, तरी त्यातून कसा मार्ग काढावा, याचे जन्मजात ज्ञान या राशीला असते. मात्र, आत्मविश्वास कमी असल्याने कितीही कष्ट केले, तरी हे लोक त्या प्रमाणात वर येऊ शकत नाहीत किंवा त्यांना वर येऊ दिले जात नाही. त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी कोणीतरी योग्य मार्गदर्शक त्यांच्यामागे असावा लागतो, तरच ते आपली सर्वांगीण प्रगती करून घेऊ शकतात.

कष्टाला बुद्धी आणि चातुर्याची जोड दिल्यास माणूस काहीही करू शकतो, हे शिकवणारी ही रास आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे गीत या राशीच्या लोकांना तंतोतंत लागू पडते. जर या राशीच्या लोकांनी व्यवहारीदृष्टी ठेवून त्याप्रमाणे काम केल्यास जीवनात ते निश्चितच यशस्वी होतील. तसेच, कुणाच्या पायाही पडावे लागणार नाही. या राशीत शरीर सामर्थ्यापेक्षा बौद्धिक सामर्थ्य जास्त असते. या वर्षीची ग्रहस्थिती काय सांगते, याचा थोडक्यात घेतलेला अंदाज. मात्र, ग्रहमान कितीही चांगले अथवा अनिष्ट असो, तुमच्या मूळ पत्रिकेतील ग्रहस्थिती कशी असेल, त्यानुसार कमी-जास्त प्रमाणात ही फळे मिळतात.

यावर्षी शनि महाराज संपूर्ण वर्षभर अष्टमातच ठाण मांडून राहणार आहेत. वारसा हक्क किंवा विवाहापासून फायदा होईल. उद्योग धंद्यात भरभराट होईल. स्वतःच्या काटकसरीने पैसा शिल्लक पडेल. दिवाणी दावे असतील, तर त्यात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होईल. धार्मिक कार्याशी संबंधित असणारे व्यवहार धर्मगुरू, पुजारी वगैरेंना उत्तम काळ, पण भागीदारी व्यवसाय असेल तर मात्र जरा काळजी घ्यावी. सरकारी अधिकाऱ्यांकडून त्रास होऊ शकेल. वर्षभराच्या कालखंडात रवि आणि मंगळाशी या शनिचा अशुभ योग्य होईल, तेव्हा अपघात व जीवावरचे प्रसंग येतील.

१३ एप्रिलपर्यंत गुरु महाराज भाग्यात व त्यापुढे दशमात राहणार आहे. संपूर्ण वर्षभर या गुरुची अत्यंत शुभ फळे मिळतील. सर्व आशा-आकांक्षा, इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात महत्त्वाची आणि मोठी जागा मिळेल. नवीन आणि क्रांतिकारी विचार यामुळे सर्वत्र नावलौकिक होईल. कुटुंबात धार्मिक मंगलकार्य होण्याचे योग. समाजात मानसन्मान मिळवाल. शिक्षण संस्था किंवा धार्मिक संघटना यात नेतृत्व करण्याची संधी मिळेल, पण कोट दरबार जपून करावे. तसेच, फार दूरवरचे प्रवास करू नयेत. जे काही चांगले काम कराल, त्यात फार मोठे यश मिळवाल. सामाजिक दर्जा वाढेल. कायदा, राजकारण व धार्मिक क्षेत्रात असाल तर फार मोठी संपत्ती मिळेल, पण कोणत्याही अनैतिक कृत्यात गुंतू नका. यावर्षी तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या घटना घडणार आहेत, त्यात दैवी शक्तींचा वरदहस्त असेल. पैसा तुमच्या मागे धावत येईल. जर एखादा नवीन मोठा उद्योग-व्यवसाय सुरू करणार असाल तर तो जोरात चालेल. पूर्वी जर एखादा व्यवसाय बंद पडला असेल तर तो सुरू करण्यास हरकत नाही. त्यात चांगली प्रगती होईल. सरकार दरबारी मानसन्मान मिळेल.

१६ मार्चपर्यंत राहू बाराव्या स्थानी व केतू सहावा राहील. हा काळ धोकादायक असतो. सर्व बाबतीत काळजी घ्या. वाहन जपून चालवा. रात्री-बेरात्री बेभरवशाच्या ठिकाणी जाणे टाळा. त्यानंतर राहू लाभात येईल. मानाची व प्रतिष्ठेची नोकरी मिळेल. अपेक्षेपेक्षा अधिक धनलाभ होतील. नोकर-चाकर ठेवण्याची ऐपत निर्माण होईल. वाहन घेण्याची इच्छा पूर्ण करू शकाल. कमी श्रमात आकस्मिक पैसे मिळविण्याच्या मागे लागाल, पण त्यात नुकसान होईल. लॉटरी, शर्यती यांच्या मागे लागू नका. मुलाबाळांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांच्यामुळे एखादे नको ते संकट उद्‍भवण्याची शक्यता आहे. हर्षल वर्षभर लाभस्थानी आहे. नवीन ओळखी होतील, त्यांच्यामुळे जीवनातील बऱ्याच अडचणी कमी होण्यास मदत होईल. ध्यानीमनी नसता अचानक काहीतरी मोठे लाभ होऊ शकतात. तसेच जागा, घरदार, दागदागिने वगैरेंचा लाभही होऊ शकतो.

अध्यात्माचा अधिपती नेपच्यून भाग्यात आहे. त्यामुळे तुमच्या आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर अनेक जण तुमच्याकडे आकर्षिले जातील. काही जणांना दृष्टांत आणि साक्षात्काराचा अनुभव येईल. पण, प्रवासात त्रास व कोर्ट प्रकरणात धोका होऊ शकतो. प्लुटो अष्टमात आहे. भागीदारी व्यवसाय व गुप्त कराराद्वारे मोठे धनलाभ होऊ शकतात. गूढ शास्त्र किमया वगैरे शिकण्याची आवड निर्माण होईल, पण विध्वंसक वृत्तीच्या घटकापासून दूर राहा. त्यांच्या कारवायामुळे धोक्यात येऊ शकाल. यावर्षी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना वारंवार प्रवासयोग येतील. आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्र असणाऱ्यांना सर्व सुख उपभोगण्यास मिळतील.

मासिक फलाफल -

  • जानेवारी - परदेश प्रवासयोग अथवा परदेशी व्यवहाराशी संबंधित कामकाजात यश. मात्र, जगावेगळी काही प्रकरणे उद्‍भवतील. किमती वस्तूंचे प्रदर्शन करू नका. चोरी वगैरेची शक्यता आहे. स्वतःच्या कमाईची कुठेही वाच्यता करू नका.

  • फेब्रुवारी - रवि-शनि अष्टमात. पूर्वार्धात शारीरिक त्रास, किरकोळ अपघात व दुर्घटना तसेच नोकरी-व्यवसायात अडचणी. उत्तरार्धात महत्त्वाची कामे होतील. काही जणांना प्रसिद्धी मिळेल.

  • मार्च - कितीही अडचणी आल्या, तरी त्यातून योग्य मार्ग निघेल. प्रत्येक कार्यात दैवी सहाय्य मिळेल. सरकारी कामे सर्वांची मर्जी सांभाळून करावी लागतील. पेंट्स व केमिकलशी संबंध असेल, तर जरा जपून राहावे लागेल.

  • एप्रिल - अपेक्षा नसलेल्या ठिकाणाहून धनलाभ होण्याची शक्यता. संततीच्या बाबतीत चिंतेचे प्रसंग. प्रामाणिकपणाने काम करूनही काही जणांची बोलणी खावी लागतील. या महिन्यात शक्यतो कोणाची जबाबदारी आपणहून स्वीकारू नका.

  • मे - पूर्वी केलेल्या कष्टाचा मोबदला मिळेल. धार्मिक वातावरण व योग्य नियोजन ठेवल्यास पैसा टिकेल. गुरु-शुक्र युतीचा चांगला परिणाम दिसेल. मनासारखी नोकरी मिळेल. काही किरकोळ अडचणी आल्या, तरी सर्व बाबतीत मोठे यश संपादन करू शकाल.

  • जून - जर नोकरी वगैरे सुटलेली असेल, तर ती या महिन्यात परत मिळण्याचे योग दिसतात. आर्थिक बाबतीत उत्तम योग. प्रापंचिक जीवनात शुभ घटना. संतती इच्छुकांना आनंदी वृत्त समजेल. नोकरीत असाल तर बढती किंवा अपेक्षित ठिकाणी बदली होईल. कुटुंबातील वादावादी आणि मतभेद यावर काहीतरी चांगला मार्ग निघेल.

  • जुलै - काही वेळा कमी श्रमात मोठा पैसा मिळविण्याची इच्छा होते; पण अनैतिक बाबींकडे मन वळू देऊ नका. आत्मसन्मान व चारित्र्याची काळजी घ्या. नोकरीत कोणाचेही मन दुखवू नका. पूर्वी कमावलेल्या इष्टेटीबाबत कायदेशीर भानगडी उपस्थित होतील. क्षुल्लक कारणांवरून कोर्टबाजी करण्याचा प्रसंग येईल. शक्यतो नमते घेतल्यास चांगले. घरातील खासगी गोष्टी बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घ्या.

  • ऑगस्ट - बुद्धिमत्ता आणि कर्तबगारीला वाव मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कोणतेही काम अवघड वाटणार नाही. काही कारणाने निर्माण झालेले संशयी वातावरण निवळेल. पती-पत्नीतील प्रेम वृद्धिंगत होईल. दूषित शुक्र व बाराव्या मंगळाचे भ्रमण चैन व इतर बाबींसाठी खर्च वाढवील. त्यामुळे खर्च करताना जरा लक्ष ठेवावे लागेल.

  • सप्टेंबर - रवि-गुरु प्रतियोग मोठ्या कामात यश मिळवून देईल. आर्थिक लाभ चांगले होतील. कोणत्याही क्षेत्रात राहा, त्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी अथवा पदासाठी तुमच्या नावाची शिफारस केली जाईल. काही भाग्यवंतांना गेलेली नोकरी परत मिळण्याची शक्यता.

  • ऑक्टोबर - शुक्राचे पाठबळ चांगले आहे, त्यामुळे कोणत्याही बाबतीत फारशी अडचण जाणवणार नाही. मात्र, तरीही नोकरी-व्यवसायात अडचणी, सरकारी अधिकाऱ्यांची अरेरावी, कामाचा ताण वाढणे, त्यामुळे चिडचिड होणे, एखाद्या प्रकरणात अडकणे, त्यामुळे मनस्ताप अशा घटना घडू शकतात. सावध राहणे योग्य.

  • नोव्हेंबर - खोळंबलेल्या विवाहाच्या दृष्टीने अनुकूल काळ. योग्य नियोजन केल्याने काही व्यावहारिक गणिते बरोबर जमतील. आर्थिक बाबतीत सावध राहून खर्च करावा लागेल.

  • डिसेंबर - वेळीच योग्य उपाययोजना केल्याने शत्रूंच्या कारवाया थंड पडतील. काही उलट-सुलट खाण्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्‍भवतील. गुरुचे भ्रमण सर्व दृष्टीने लाभदायक. कुटुंबात एखादी शुभ घटना घडेल, पण मामा, मावशी व तत्सम मातुल पक्षाच्या व्यक्तींशी मतभेद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT