Christmas esakal
संस्कृती

Christmas 2021: ख्रिसमस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास, महत्व

नाताळच्या पूर्वसंध्येला या सणाचा उत्सव सुरू होतो

सकाळ डिजिटल टीम

२०२१ वर्षाला निरोप देण्यासाठी सारेच सज्ज आहेत. पण त्याआधी लोकं ख्रिसमसचा (Christmas) आनंद लुटण्यासाठी सज्ज असतात. आज २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. २४ डिसेंबरच्या संध्याकाळपासून नाताळच्या पूर्वसंध्येला या सणाचा उत्सव सुरू होतो. अनेक लोकं कुटुंबातील सदस्यांसह गेट-टुगेदर साजरे करून या सणाचा आनंद लुटतात.

लोकं घराला कलरफूल लाईट्स आणि डेकोरेशन करून ख्रिसमस साजरा करतात. ख्रिसमस ट्री घरांमध्ये आणला जातो. जगभरातील ख्रिश्चन समुदायासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे.

christmas

असा आहे इतिहास (History of Christmas 2021)

ख्रिसमस हा शब्द अलीकडचा आहे. त्याचे भाषांतर मास ऑफ ख्रिस( mass on Christ's ) डे असे केले जाते. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये या सणाला वेगवेगळी नावे आहेत. जर्मनीमध्ये युलेटाइड, स्पॅनिशमध्ये नाविडॅड, इटालियनमध्ये नताले आणि फ्रेंचमध्ये नोएल असे संबोधले जाते. असे मानले जाते की, येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेममध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या गोठ्यात झाला होता. ग्रेगोरियन कॅलेंडर पूर्वी अस्तित्वात नसल्यामुळे, त्याचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाल्याचा कोणताही पुरावा नाही. बायबलमध्येही त्याच्या जन्माच्या योग्य तारखेचा उल्लेख नाही. सम्राट कॉन्स्टंटाईन या पहिल्या ख्रिश्चन रोमन सम्राटाने 25 डिसेंबरला ख्रिसमस म्हणून घोषित केले. काही वर्षांनंतर, पोप ज्युलियस I ने जाहीर केले की हा दिवस ख्रिस्ताचा जन्म म्हणून साजरा केला जाईल.

Christmas

हे आहे महत्व (Significance of Christmas 2021)

ख्रिसमसचे महत्व ख्रिश्चन समुदायासाठी खूप मोठे आहे. त्यांचा असा विश्वास आहे की देवाने आपल्या मुलाला स्वतःचे बलिदान देण्यासाठी पृथ्वीवर पाठवले, असा त्यांचा विश्वास आहे. तो सर्व मानवतेचे तारण करण्यासाठी आणि त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी आला आहे. म्हणूनच येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावर चढणे हे अंतिम बलिदानाचे प्रतीक आहे, असे ख्रिश्चन धर्मीय मानतात. लोक ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला चर्चमध्ये मध्यरात्री सामूहिक हजेरी लावतात लोक चर्चमध्ये कॅरोल गातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT