पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १७ ॲागस्ट २०२२ (daily panchnag 17 august 2022)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २६ शके १९४४
आज सूर्योदय ०६:१९ वाजता तर सूर्यास्त १८:५७ वाजता होणार. आज चंद्रोदय वाजता २२:५६ प्रात: संध्या ही स.०५:११ ते स.०६:१९ वाजता होणार. आज सायं संध्या ही १८:५७ ते २०:०६ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:५५ ते १६:२६ दरम्यान होणार. आज प्रदोषकाळ हा १८:५७ ते २१:१४ वाजता होणार आज निशीथ काळ हा २४:१६ ते २५:०२ दरम्यान आहे. आज राहु काळ हा १२:३९ ते १४:१३ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा ०७:५५ ते ०९:२९ दरम्यान आहे.
आज श्राद्धतिथी ही षष्ठी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३२ ते दु.१२:१३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी तेल खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
लाभदायक -
लाभ मुहूर्त - १७:२२ ते १८:५७
अमृत मुहूर्त - ०७:५५ ते ०९:२९
विजय मुहूर्त - १४:४५ ते १५:३६
पृथ्वीवर अग्निवास २३:४७ नं. गुरू मुखात आहुती आहे. शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा(सौर)
मास - श्रावण
पक्ष - कृष्ण
तिथी - षष्ठी(२३:४७ प.नं.सप्तमी)
वार - बुधवार
नक्षत्र - अश्विनी(२६:०९ प.नं.भरणी)
योग - गंड(२५:५३ प.नं.वृद्धि)
करण - गरज(११:५२ प.नं. वणिज)
चंद्र रास - मेष
सूर्य रास - कर्क (२२:२२ नं.सिंह)
गुरु रास - मीन
विशेष:- भद्रा २३:४७ नं.,रवि सिंहेत/मघा नक्षत्रात रा.१०:२२, मु.३०, अश्ववाहन, खंडित वृष्टियोग,संक्रांती पुण्यकाळ दु.१२:३८ ते सूर्यास्त, छत्रदान, सुवर्णदान, बुधबृहस्पती पूजन
या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.