Vijapur Datt Temple
Vijapur Datt Temple  Esakal
संस्कृती

Datta Jayanti 2022 : जेव्हा इब्राहिम अली या भक्ताला दत्तगुरूंनी राजा होण्याचा वर दिला…!

सकाळ डिजिटल टीम

पूरातन काळापासून भारतात हिंदू मुस्लिम ऐक्य पहायला मिळते. हिंदू देवतांशी जोडलेली अनेक मुस्लिम भक्त होऊन गेले आहेत. तर, दर्ग्याचा उरूस आजही मोठ्या प्रामाणात हिंदू लोक साजरा करतात. दत्त सांप्रदायातही अनेक ठिकाणी मुस्लिम भक्तांचा उल्लेख आढळतो. शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या काळातही मुस्लिम लोक त्यांचे भक्त होते. त्यांची पूजा करत होते.

असाच एक दत्त महाराजांचा भक्त होऊन गेलाय. ज्याला आपले नित्य दर्शन व्हावे यासाठी दत्त महाराजांनी त्याला दृष्टांत देऊन आपले स्थान दाखवले. त्या दृष्टांताप्रमाणे त्या भक्ताला दत्त महाराजांच्या पादुका पिंपळाच्या वृक्षाच्या छायेत सापडल्या. त्या भक्ताबद्दल एक कथा सांगितली जाते. ही कथा खरी असल्याचे पुरावे गुरूचरित्राच्या दोन अध्यायात सापडतात.

विजापूरला नृसिंह मंदिर परिसरातच एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराबद्दल असे सांगितले जाते की, श्रीनृसिंहसरस्वतींचा एक मुसलमान भक्त त्या वेळच्या विजापूरचा बादशहा इब्राहिम अली याने या मंदिराची स्थापना केली आहे. गुरुचरित्राच्या ९ व्या आणि ४९ व्या अध्यायात एका राजाची कथा येते. त्यानुसार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा एक भक्त त्यांच्याकडे राजा होण्याची इच्छा व्यक्त करतो.श्रीपाद श्रीवल्लभ त्याला तू पुढील जन्मात राजा होशील असा वर देतात. तोच हा इब्राहिम अली होय, असे मानले जाते. त्याच्या पायाला झालेली जखम श्री नृसिंहसरस्वती यांनी केवळ त्या जखमेकडे पाहून बरी केली. आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण करून दिले. नंतर हा बादशाह स्वामींचा अनन्यभक्त झाला अशी ही कथा.

दत्त महाराजांच्या दर्शनाचा लाभ निरंतर घडावा अशी त्याने स्वामीचरणी मनोभावे प्रार्थना केली. त्याचा सद्भाव पाहून स्वामींनी ती मान्य केली. विजापुराभोवती असलेल्या खंदकाच्या मध्यभागी पश्चिमेस जो पिंपळाचा वृक्ष आहे तिथे किल्ल्यात माझ्या पादुका तुला मिळतील त्यावर मंदिर बांधून माझी सेवा कर असे स्वामींनी त्याला सांगितले.

स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बादशहास त्या पिंपळवृक्षाखाली पादुका सापडल्या. त्यावर त्याने मंदिर बांधले व श्रींची सेवा केली. पुढे त्या पिंपळवृक्षाला आत घेऊनच नृसिंहाचे देवालय उभारण्यात आले. आणि मंदिरात दत्तमूर्ती बसविण्यात आली. देवालयाला लागून पाण्याचा मोठा तलाव आहे. या तलावाला देवळाकडील बाजूने एक घाटही बांधण्यात आलाय. या मंदिरात गुरुवारी आणि धार्मिक सणांच्या दिवशी श्री दत्ताचा छबिना काढतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT