Deep Amavasya esakal
संस्कृती

Deep Amavasya : ...म्हणून दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळावे

आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या फार महत्वाचा समजला जातो.

धनश्री भावसार-बगाडे

Deep Amavasya Importance : आषाढ महिन्यातल्या अमावस्येला धर्मशास्त्रात विशेष महत्व सांगितलं आहे. बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहित असतो. कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार, मद्यपान करत नाहीत. त्यामुळे हा आषाढ महिन्यातला शेवटच्या दिवशी ते मनसोक्त पार्टी करतात.

पण खरे तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सांगण्यात आली आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवाळायची प्रथा आहे. ती का? जाणून घेऊया.

भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातींना, ज्योतीला फार महत्व असते. भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राण शक्तीशी निगडीत आहे. आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्व दिले जाते. त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे. म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते. जे वंश उजळून काढतील असे मानले जाते.

काय आहे कथा?

यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी, गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळ वासियांना भयमुक्त केले. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली. आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना केली.

तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले.

लहान मुलांना का ओवाळावे

प्रकाश अंधःकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटांच्या अंधःकाराला चीरून सर्व संकंट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छाने मुलांना दिव्याने ओवाळले जाते.

आजचे मुले हे भाविष्यातले जबाबदार नागकरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे. याचा संबंध कृष्ण कथेत आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT