Viral News esakal
संस्कृती

Viral News: असे देवाची काळजी तिच खरी भक्ती! थंडी वाजेल म्हणून भक्तांनी घातलेत देवांना लोकरीचे कपडे

काळजी दर्शवत काशीच्या मंदिरात भक्तांनी देवांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना लोकरी कपडे वस्त्र घालून दिलेत

सकाळ ऑनलाईन टीम

Woolen Clothes To God: देव आणि भक्त यांच्यामध्ये कायम श्रद्धा आणि भक्ती भावाचं नातं राहीलं आहे. देव जसा भक्तांच्या मनातलं दु:ख जाणतो त्याचप्रमाणे भक्तांनासुद्धा देवाची काळजी असते. हीच काळजी दर्शवत काशीच्या मंदिरात भक्तांनी देवांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना लोकरी कपडे वस्त्र घालून दिलेत.

देवांनाही थंडी वाजते काय की त्यांनाही तहान भूक लागते? या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कदाचित काशीच्या मंदिरांत मिळू शकेल. कारण येथील भक्तांनी देवांना थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांना वूलन कपड्यांसह टोपसुद्धा घालून दिलाय.

पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थानसह आणि हिमाचल प्रदेशासह आता वाराणसीमध्येही तुम्हाला अनोखी पद्धत दिसून येईल. गोलघर क्षेत्रातलं प्राचीन सिद्धिदात्रीचं मंदिर असो किंवा मग मैदिगिन क्षेत्रातलं संकट हरण शनिदेव महाराजांचं मंदिर असो या सगळ्या ठिकाणी देवांचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना लोकरीचे वस्त्र घालून दिल्या गेलेय.

यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी हे देखील सांगितले की भक्तांना थंडीच्या दिवसांत थंडी वाजू नये याची देखील विशेष काळजी घेतली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT