संस्कृती

Diwali 2022 : दिवाळीत सगळीकडे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक कारण

दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. हा उत्सव धनत्रयोदशीच्या म्हणजेच कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीला सुरू होतो आणि अमावास्येपर्यंत साजरा केला जातो. संध्याकाळ झाली की घरात आई आपल्याला सांगत असे की चल आता दारापुढे, तुळशीपुढे, खिडक्यांमध्ये, सगळीकडे दिवा लाव. घरात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या हे तीन दिवस सतत दिवे लावले जातात शिवाय अनेक ठिकाणी अखंड दिवा देखील लावला जातो.

दीपोत्सव हा भगवान विष्णूच्या गृहस्वरूपाचा उत्सव आहे. या सणात श्री गणेशाची पूजा केली नाही तर लक्ष्मी देवीही टिकत नाही. त्यामुळे दोघांची पूजा आवश्यक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात यमदिपदान केल्याने मृत्यूचे भय दूर होते. हिंदू धर्मात, प्रकाशाची नेहमी सूर्य आणि अग्नीच्या रूपात पूजा केली जाते.

सर्व प्राण्यांना प्रकाश आणि जीवन देण्यासाठी सूर्याची उत्पत्ती देवाच्या दक्षिण नेत्रातून झाली असे म्हटले जाते. प्रत्येक पंथात प्रकाश आणि प्रकाशाचे स्वतःचे महत्त्व आहे. लंका जिंकून भगवान राम अयोध्येला परत आले, तो दिवस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या होता. सर्व अयोध्यावासीयांनी दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले. या दिवसापासून दिवाळीला दिवा लावण्याची परंपरा सुरू आहे.

दिवा आणि त्याची ज्योत जीवनासारखी तेजस्वी आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, जल आणि वायू या पाचही तत्वांपासून दिवा तयार होतो आणि प्रकाशित होतो. दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने वातावरणातील विषारी जंतू नष्ट होतात.कुटुंबातील दारिद्र्य दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या संध्याकाळपासून दीपावलीच्या रात्रीपर्यंत अखंड दिवा लावणे फायदेशीर मानले जाते. धनत्रयोदशीपासून भाऊबिजेपर्यंत घरात अखंड दिवा लावल्याने घरातले पंच महाभूत संतुलित राहतात आणि त्याचा प्रभाव वर्षभर माणसाच्या आयुष्यावर राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

SCROLL FOR NEXT