Diwali 2022 esakal
संस्कृती

Diwali 2022 : दिवाळीत 'या' गोष्टींकडे करू नका दूर्लक्ष, नाहीतर आनंदात पडेल विरजण

उत्साहाच्या भरात लगबगीत आपण साध्या साध्या गोष्टींकडे दूर्लक्ष करतो आणि आपल्या आनंदात विरजण पडतं.

सकाळ डिजिटल टीम

Precautions in Diwali Celebration : वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून साजरी होणारी दिवाळी देशभरच मोठ्या उत्साहात साजरी होते. घरात, दारात, बाल्कनीत सगळीकडे दिव्यांची रोषणाई केली जाते. नवीन रेशमी, तलम कपडे घालून, स्वादिष्ट फराळ खाणे, फटाके फोडणे याची मजाच काही और असते.

पण या सगळ्यात काही गोष्टींची काळजी घेणं फार आवश्यक असतं. उत्साहाच्या भरात लगबगीत आपण साध्या साध्या गोष्टींकडे दूर्लक्ष करतो आणि आपल्या आनंदात विरजण पडतं.

'ही' काळजी घ्या

  • दिवाळीत घरोघरी पणत्या आणि दिवे लावले जातात. हे दिवे लावताना ते कागद, कपडे, लाकूड किंवा ज्वलनशील वस्तूंच्या आसपास तर नाहीत ना, याची खबरदारी घ्यावी.

  • शक्यतो फटाके उडवणे टाळावेच, पण तरीही ते उडवायचेच असल्यास घरापासून दूर मोकळ्या जागेत जाऊन उडवावेत.

  • फटाके उडवतानाही आसपास काही ज्वलनशील वस्तू नाही ना, याची काळजी घेणे आवश्यकच.

  • लहान मुले फटाके उडवत असताना मोठय़ांपैकी कुणीतरी त्यांच्याबरोबर असावे.

  • पायांत चपला घातल्याशिवाय फटाके उडवू नयेत.

  • फटाके उडवायला जाताना बरोबर पाणी किंवा वाळू भरलेली बादली न्यायला विसरू नका. जवळ प्रथमोपचार पेटीही हवीच.

  • अडचणीच्या जागी रॉकेटसारखे फटाके उडवू नका. विद्युत तारांजवळ किंवा घराच्या उघडय़ा खिडक्यांजवळ फटाके उडवणे धोकादायक ठरू शकते.

  • फटाके उडवताना कपडय़ांकडेही लक्ष हवे. अशा वेळी अंगाबरोबर बसणारे आणि शक्यतो सुती कपडेच घाला. घोळदार, नायलॉनचे कपडे फटाके उडवताना नकोत.

  • फुलबाज्या उडवून झाल्यावर त्याच्या काडय़ा एका बाजूला एकत्र कराव्या. फुलबाजीच्या काडय़ा धातूच्या असल्यामुळे त्या बराच वेळ गरम राहतात. त्या इथे- तिथे पडल्यास त्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते.

  • फटाके उडवून झाल्यावर ते उडवलेले फटाकेही एका बाजूला सारून ठेवावेत.

  • खूप मोठा आवाज सतत कानावर आदळल्यामुळे ऐकू येण्याची शक्ती कमी होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच निद्रानाशासंबंधीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. अचानक वाढलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो. ध्वनी प्रदूषण करणारे फटाके न उडवणे आपल्याच हातात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: अंजनगावात तणाव! लक्ष्मण हाकेंचं ठिय्या आंदोलन, आमदार अभिजित पाटील गावात दाखल

See-Wood Farming : ‘सी-वीड’ शेतीतून महिलांची झेप; समुद्रातून उभा राहतोय रोजगार

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी २०२७ चा वर्ल्ड कप खेळायला हवा का? युवराज सिंगचं परखड मत; म्हणाला, मला आदर मिळाला नाही, तो...

"फिजिकल रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट आहे का?" कंगनाने रणबीर कपूरला थेट विचारलं होतं... काय आहे किस्सा?

PSL 2026: पाकिस्तान सुपर लीग मध्ये नवा वाद; डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्या भांडणाचा Video Viral

SCROLL FOR NEXT