Lakshmi Pujan 2022 esakal
संस्कृती

Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मी मातेची मांडणी अन् पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची विधी

अशी करा लक्ष्मी मातेची विधीवत पूजा

सकाळ डिजिटल टीम

Lakshmi puja vidhi: यंदा छोटी दिवाळी आणि दिवाळी एकाच दिवशी आली आहे. यादिवशी अनेकजण पहाटे उठून स्नान करतात. आज संध्याकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात येईल. अनेक नवविवाहित जोडप्यांना पूजेची योग्य विधी माहिती नसू शकते. तेव्हा अशांनी पूजेची आणि विधी आणि विशेष म्हणजे मुहूर्त जाणून घ्या.

दिवाळी हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06.53 ते रात्री 08.16 पर्यंत आहे. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या लक्ष्मीपूजनाची सोपी मांडणी. (Diwali)

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य

लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती

गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती

कुबेराचा फोटो किंवा मूर्ती

नाणी किंवा नोटा

दागिने किंवा चांदीची नाणी

एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा.

चौरंग किंवा पाठ

लाल रंगाचे कापड

पाणी

तांदूळ

गंध

पंचामृत

हळद, कुंकू

अक्षदा

फुले

विड्याची पाच पाने

झाडू

लाह्या बताशे (pooja sahitya)

लक्ष्मीपूजन विधी (Lakshmi Pujan ritual)

लक्ष्मीपूजनाची विधी करण्याकरिता ४आधी देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड टाकावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावी आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असायला हवी. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंगावर मध्यभागी तांदुळाची रास करावी. त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात.

त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे नाणी ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

Shirur Police Crackdown: शिरूर पोलिसांची गावठी व बेकायदा दारूविक्रीवर धडक कारवाई; हातभट्ट्या उध्वस्त

SCROLL FOR NEXT