Bhaubeej 2023 esakal
संस्कृती

Bhaubeej 2023 : आज आहे भाऊबीज, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

बहीण आणि भावाच्या नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे भाऊबीज होयं.

Monika Lonkar –Kumbhar

Bhaubeej 2023 : दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा, जिव्हाळ्याचा आणि दिव्यांचा सण आहे. हिंदू धर्मामध्ये दिवाळीचे खास महत्व आहे. आपल्या देशात दिवाळी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते.

नुकताच लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी आणि दिवाळी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाडवा झाला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. आज भाऊबीजचा सण आहे.

भाऊबीजच्या सणाने दिवाळीची समाप्ती होणार आहे. भाऊ-बहीणीच्या अतूट नात्याचा दिवस आज आहे. त्यानिमित्त आपण भाऊबीजचा शुभ मुहूर्त कधी आहे ? त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

भाऊबीज

बहिण आणि भावाच्या नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे भाऊबीज होयं. हा दिवस भाऊ आणि बहिणीसाठी खास असतो. भावाने बहिणीबद्दल आणि बहिणीने भावाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे भाऊबीज होयं.

यंदा भाऊबीजचा हा सण १५ नोव्हेंबरला बुधवारी म्हणजेच आज साजरा केला जाणार आहे. हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो.

भाऊबीजचा शुभ मुहूर्त कधी ?

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ही मंगळवारी १४ नोव्हेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला बुधवारी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये उदया तिथीनुसार १५ नोव्हेंबरला भाऊबीजचा सण साजरा केला जाईल.

भाऊबीजचा शुभ मुहूर्त हा १५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही भाऊबीज साजरी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

SCROLL FOR NEXT