Horoscope Astrology
Horoscope Astrology सकाळ
संस्कृती

Diwali Astro Tips: खरेदी करण्याआधी जाणून घ्या, राशीनुसार कोणत्या रंगाचे कपडे घातल्याने होणार लाभ!

सकाळ डिजिटल टीम

खरेदीला गेल्यावर विशिष्ट रंगाचेच कपडे का निवडता तुम्ही. तूमच्याकडे त्या रंगाचे बरेच ड्रेस असतील तरी तूम्ही पून्हा तेच कपडे का घेता याचा कधी विचार केलाय का?. नाही ना, तर हे असे होण्याचे कारण म्हणजे तूमची रास. तुमची रास तूम्हाला काय आवडते काय नाही यावर प्रभाव पाडते. तसेच ती तूम्ही कोणत्या रंगाचे कपडे घातल्यावर तुम्हाला लाभ होतील हेही ठरवते. 

निसर्गाशी संबंधित प्रत्येक रंगात एक प्रकारचा गुण असतो. जेव्हा आपण रंगांच्या गुणांचा योग्य समन्वय साधतो. तेव्हा आपल्याला अनेक लाभ होतील. ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींसाठी वेगवेगळ्या शुभ रंग देण्यात आले आहेत. जर आपण येणाऱ्या दिवाळीत राशीनुसार रंगांचे कपडे घातले तर ही दिवाळी खऱ्या अर्थाने लाभदायक ठरेल.

● मेष

मेष राशीचा स्वामी मंगळ असून त्याला नेहमीच लाल रंग आकर्षित करतो. त्यामुळे मेष राशीवाल्यांनी लाल रंग किंवा त्याच्याशी मिळता जुळता रंग वापरावा. नारंगी, मरूम हेही रंग वापरू शकता. लक्ष्मी पूजन करताना लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल. 

● वृषभ

वृषभ राशीसाठी निळा रंग सर्वात शुभ मानला जातो. दिवाळीत कपडे निवडताना निळा रंग निवडल्यास तो तुमच्या आयुष्यात शुभ घटना घडवू शकतो. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी स्त्रीयांनी निळ्या रंगाची साडी तर पुरूषांनी निळ्या रंगाचा कूर्ता घालावा.

● मिथुन

मिथुन राशीचे लोक स्वभावाने शांत असतात. केशरी रंग नेहमीच त्यांचे व्यक्तिमत्व जाहीर करतो. त्यामुळे आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर दिवाळी पूजेत केशरी रंगाचेच कपडे घाला.

● कर्क 

कर्क राशीच्या लोकांनी दिवाळीच्या पूजेदरम्यान हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले तर त्यांच्या आयुष्यात कधीही तणावाची परिस्थिती उद्भवत नाही. यामुळे आर्थिक लाभही होतो. हिरवा रंग देखील बुध ग्रहाचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी हिरवा रंग धारण केल्याने गणपतीही प्रसन्न होतो.

● सिंह राशी 

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी मानला जातो. असे मानले जाते की सिंह राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी तपकिरी रंगाचे कपडे परिधान केले तर त्यांच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी राहते.

● कन्या

कन्या राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास जीवनात सुख-समृद्धी येण्यास मदत होते. पिवळा रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो.

● तूळ

तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र मानला जातो. शुक्र हा सौंदर्याचा ग्रह असल्याचे मानले जाते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी पांढरे, सिल्वर किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान केले तर ते तुमच्या जीवनात समृद्धीचे कारक ठरेल. 

● वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ देखील मानला जातो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या महिलांनी दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी लाल रंगाची साडी नेसल्यास त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल.

● धनु

धनु राशीच्या लोकांनी दिवाळीच्या पूजेमध्ये जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. लहान मुलांनाही याच रंगाचे कपडे घ्यावेत. हा रंग समृद्धीचे प्रतिक मानला जातो. हा रंग तूम्ही दिवाळीत आणि इतर वेळी वापरला तर तुमच्या जीवनात समृद्धीचे आगमन होईल. 

● मकर

जर मकर राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी हलके गुलाबी किंवा फिकट जांभळे कपडे घालावे. असेत कपडे खरेदी करावेत. ते तूमच्या कुटुंबाच्या आनंदासाठी भाग्यकारक ठरेल.

● कुंभ

शनि हा कुंभ राशीचा ग्रह मानला जातो. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही लाइट निळा किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान केलेत तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यासाठी ते फायद्याचे ठरेल.

● मीन

मीन राशीसाठी गुलाबी हा सर्वात शुभ रंग मानला जातो. जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी, कूर्ता घालून लक्ष्मीपूजन केले तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT