Diwali Astro Tip  esakal
संस्कृती

Diwali Astro Tip : ग्रह,वास्तुदोष दूर करणारी हे लकी प्लांट दिवाळीत आणा घरी

आपल्या सभोवती असलेली काही लकी प्लांट आपले नशीब पालटवू शकतात

सकाळ डिजिटल टीम

पुणे : हिरव्यागार निसर्गाचा सहवास कोणाला आवडत नाही?. झाडे आपल्या सभोवतालचे वातावरण फ्रेश ठेवतात. घरात झाडे लावल्याने ते घराच्या सौंदर्यात भर घालतात. म्हणूनच आजकाल अनेकजण बागेत, घरात, बाल्कनीत झाडे लावतात. पण तुम्हाला माहिती आहे काय की या झाडांचा आपल्या नशीबाशी डायरेक्ट संबंध आहे. घरात आपल्या सभोवती असलेली काही लकी प्लांट आपले नशीब पालटवू शकतात.

वास्तूचा झाडे आणि वनस्पतींशी विशेष संबंध असतो. असे म्हणतात की, घरात काही विशेष प्लांट लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. आज आम्ही तुम्हाला अशा प्लांटबद्दल सांगत आहोत. यंदाच्या दिवाळीत घरात आणल्याने किंवा कोणीलातरी गिफ्ट म्हणून दिल्याने घरात सकारात्मकता पसरते.

रबर प्लांट

हा रबर प्लांट विशेषतः भारत, मलेशिया आणि जावामध्ये लोकप्रिय आहे. हे फेंगशुई आणि वास्तुशास्त्रातील लकी वनस्पतींपैकी एक मानले जाते. याची पाने गोलाकार नाण्यांसारखी असतात. त्यामुळे हे प्लांट संपत्ती, आरोग्य आणि भाग्यवान नशीबाचे प्रतिनिधीत्व करते. हे प्लांट घरातील हवा सुधारते आणि नकारात्मकता दूर करते.दिवाळीत होणारे प्रदुषणावर हे प्लांट गुणकारी ठरते.

फॉर्च्युन प्लांट

आशियाई देशांमध्ये कॉर्न किंवा फॉर्च्यून प्लांट इनडोअर प्लांट म्हणून आणले जाते. भाग्यवान नशीबाचे ते प्रतीक मानले जाते. घरामध्ये आणल्यावर ही वनस्पती वाढली तर याचा अर्थ सकारात्मकरीत्या घेतला जातो. हे प्लांट बहरले तर त्या घरातील व्यक्तीला धनसंपत्तीचा लाभ होईल. घरातील हवा शुद्ध करण्याचेही काम हे प्लांट करते.

जेड प्लांट

ही वनस्पती नशीब आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. ते घरी किंवा ऑफिसमध्ये लावणे उत्तम मानले जाते. जेड पानांचा आकार जेड दगडांसारखा असतो. हे प्लांट वृद्धी आणि पुनरुत्पादनाचे प्रतीक देखील मानले जाते. चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी तूम्ही हे प्लांट ठेऊ शकता.

मनी प्लांट

मनी प्लांटचा पैशाशी संबंध सर्वश्रुत आहे. हे बहुतेक घरांमध्ये घडते. पण ते योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने ठेवणे महत्त्वाचे आहे. मनी प्लांटची वेल खाली लटकत नसावी, तर त्यांना आधार देऊन नेहमी वरच्या बाजूस ठेवा, हे लक्षात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : राहुल गांधींसह कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचे खासदार काळे कपडे घालून संसदेत पोहोचले

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT