Diwali Dhantrayodashi Dhanteras Lakshmi pujan Narak chaturdashi Solar Eclipse surya grahan Muhurat 2022 by Panchangkarte Mohan Date esakal
संस्कृती

Diwali Muhurat 2022 : यंदा 2 दिवस धनत्रयोदशी, मग नेमका सण कधी साजरा करावा? पंचांगकर्ते दाते सांगतात...

सकाळ डिजिटल टीम

Diwali Muhurat 2022 : दिवाळी म्हटली कि प्रत्येकाच्या आनंदाला उधाण येते. सर्वत्र उत्साह अन् जल्लोषात हा दिपोत्सव साजरा केला जातो. दिवाळीच्या काळात भक्तीभावाने देवतांची पुजा, नविन वस्तुंची खरेदी, नविन कार्याचा शुभारंभ शुभ मुहूर्तावर केला जातो. यंदाच्या दिवाळीला मात्र दोन तिथी एकत्र आल्या आहेत. यासह एकच तिथी दोन दिवस आहे. यंदा दिवाळी पर्वात सुर्य ग्रहण देखील असल्याने मोठा संभ्रम निर्माण होत आहे. मात्र या सर्व प्रश्नांवर दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी विशेष खुलासा करत दिवाळीचे सण नेमके कधी साजरे करावे याची माहिती दिली आहे.

(Diwali Dhantrayodashi Dhanteras Lakshmi pujan Narak chaturdashi Solar Eclipse surya grahan Muhurat 2022 by Panchangkarte Mohan Date)

पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात, दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारस या दिवसापासून लावला जातो. यंदा 21 ऑक्टोबरला वसुबारस पुजन आहे. या दिवशी गाय- वासराचे पुजन केले जाते. याला गोधन पुजन असेही म्हणतात. गायी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुजन केले जाते.

यंदा धनत्रोदशी 2 दिवस...?

यावर श्री. दाते सांगतात, वसुबारस पुजन झाल्यानंतर त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी यादिवशी धन्वंतरी पुजनाला विशेष महत्व आहे. यंदा धनत्रयोदशी दोन दिवस असणार आहे. ज्या प्रमाणे विविध प्रदेशातील प्रदोषकाल आणि सुर्यास्तानुसार दोन संकष्टी चतुर्थी अन् दोन एकादशी येतात त्याचप्रमाणे यंदा 2 धनत्रयोदशी तिथी आल्या आहेत. महाराष्ट्रात काही विशेष जिल्ह्यांनी 22 तर काही जिल्ह्यांमध्ये 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करावी.

मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यांत 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करावी. तर सोलापुर, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भात 23 तारखेला धनत्रयोदशी साजरी करावी.

नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपुजन एकाच दिवशी

यंदा पंचांगानुसार नरक चतुर्दशी अन् लक्ष्मी पुजन हे 24 ऑक्टोबरला एकाच दिवशी आहे. नरक चतुर्दशी अन् लक्ष्मी पुजन एकत्र येणे हे नवीन नाही. गेल्यावर्षी देखील असाच योग आला होता. त्यामुळे या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करुन दिवाळीचा फराळ करावा. आणि सांयकाळी लक्ष्मीपुजन करावे असे पंचांगकर्ते दाते सांगतात.

दिवाळीला ग्रहण...?

यंदाच्या दिवाळीत 25 ऑक्टोबर रोजी ग्रहणकाळाचा भाकड दिवस आला आहे. या दिवशी सर्वांनी ग्रहणाच्या वेध काळात नियमांचे पालन करावे. आणि ग्रहण काळात अन्न ग्रहण करु नये.

पाडव्याला ग्रहणाची कर, मग पाडव्याला शुभ कर्मे करावी का...?

या प्रश्नावर पंचांगकर्ते दाते सांगतात, 26 ऑक्टोबरला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पाडवा आहे. मात्र ग्रहणाची कर देखील या दिवशी आहे. मात्र त्याचा विशेष परिणाम या दिवसावर होत नाही. मात्र यादिवशी लग्न, मुंज, वास्तुशांतीसारखी मंगलकार्ये टाळावी. देवतांची पुजा, नविन वस्तुंची खरेदी, नविन कार्याचा शुभारंभ करणे फलदायी ठरेल. याच दिवशी भाऊबीज देखील असल्याने बहिणीने भावाचे औक्षण करावे. यासह पाडव्यानिमीत्त पत्नीने देखील पतीचे औक्षण करावे असे श्री. दाते सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

Mahajyoti Skill Scam: महाज्योती बनली भ्रष्टाचाराचा अड्डा; महाज्योतीमध्ये ३०० कोटींचा 'कौशल्य विकास' घोटाळा?

SCROLL FOR NEXT