Diwali Festival 2022 :  esakal
संस्कृती

Diwali Festival 2022 : यंदा दिवाळीत सुर्य ग्रहण; जाणून घ्या लक्ष्मी पुजन कधी करावे

सकाळ वृत्तसेवा

Diwali Festival 2022 : अंधःकारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. सर्वजण या दिपोत्सवाची आतुरतेने वाट पाहात असतात. अधर्मावर धर्माचा विजय म्हणून मोठ्या उत्साह अन् जल्लोषात दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो.

यंदा दिवाळीच्या पर्वात सुर्यग्रहण असल्याने दिवाळीच्या तारखेबाबत काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवाळी नेमकी कधी साजरी करावी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला तर धर्म अभ्यासकांकडून या प्रश्नाचे उत्तर जाणून घेवूया.

(Diwali Festival 2022 Lakshmipujan Surygrahan date time muhurat significance)

अमावस्येला ग्रहण असल्याने लक्ष्मीपुजन कधी करावे?

यावर्षी अमावस्या तिथीला सूर्यग्रहण आहे. त्यामुळे नेमकी दिवाळीचे लक्ष्मीपुजन कधी करावे यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

वास्तविक यावर्षी 24 ऑक्टोबर व 25 ऑक्टोबर अशा दोन अमावस्या आहेत. यावर्षी लक्ष्मीपुजन सोमवार 24 ऑक्टोबर रोजी असून ग्रहण 25 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे लक्ष्मीपुजनासाठी ग्रहणाची कोणतीही अडचण येत नाही.

ग्रहण काळ असल्याने धार्मिक विधी होतील का?

24 ऑक्टोबरला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरला ग्रहण आहे. ग्रहण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा आहे. म्हणजे लक्ष्मीपुजन आणि बलिप्रतिपदा तिथीमध्ये एक दिवसाचे अंतर आहे ज्यादिवशी ग्रहण आहे.

त्यामुळे दिवाळीत जरी ग्रहण आले असले तरी धार्मिक विधी अन् पुजेसाठी कोणतीही अडचण नाही असे संदर्भ धर्मसिंधू आणि निर्णयसिंधू ग्रंथांमध्ये आहे.

नेमकी दिवाळी कधी...?

24 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजुन २६ मिनीटांनी चतुर्दशी तिथी संपून अमावस्या तिथी सुरू होते व 25 ऑक्टोबरला 4 वाजुन 17 मिनीटांनी संपणार आहे. दिवाळीच्या दिवशी केले जाणारे लक्ष्मीपुजन हे सुर्यास्तानंतर केले जाते. त्यामुळे 24 ऑक्टोबरलाच महालक्ष्मीची पुजा करावी असे पं. धारणे सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT