Diwali Festival 2022 esakal
संस्कृती

Diwali Festival Muhurat 2022 : यंदा दिवाळीला एकाच दिवशी 2 सण; जाणून घ्या शुभ मुहूर्त

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी संपुर्ण भारतात मोठ्या उत्साह अन् जल्लोषात साजरा केला जाणारा सण. दिव्यांची रोषणाई अन् फटाक्यांची आतिषबाजीने वातावरणात चैतन्य निर्माण होते. या उत्सवात भक्ती भावाने देवतांची पुजा केली जाते. आरोग्य अन् ऐश्वर्य समृद्धीसाठी धन्वंतरी पुजन, लक्ष्मी-कुबेर पुजन केले जाते. व्यापारी बंधु आपल्या व्यवसायातील चौपडी (वही) पुजन करतात. दिवाळीचे हे पुजन करताना विशेष मुहूर्तावर पुजन करणे शुभ मानले जाते. चला तर दिवाळीतील शुभ मुहूर्त जाणून घेऊ.

(Diwali Festival Dhanteras Narak Chaturdashi Lakshmi pujan Bhaubij Muhurat 2022)

अशी होते दिवाळीची सुरुवात

अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात दिवाळीला सुरुवात होते. अश्विन कृष्ण द्वादशीला गाय- वासराचे पुजन केले जाते. याला वसुबारस पुजन असेही म्हणतात. यंदा 21 ऑक्टोबरला वसुबारस पुजन आहे.

वसुबारस पुजन झाल्यानंतर त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी यादिवशी धन्वंतरी पुजनाला विशेष महत्व आहे. यंदा 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे.

धनत्रयोदशी पुजन झाल्यानंतर चतुर्दशीला नरकचतुर्दशी साजरी केली जाते. पौराणिक कथांनुसार श्री कृष्णाने या दिवशी नरकासुराचा वध केला अशी मान्यता आहे. यासह अकाली मृत्यूपासून रक्षण यासह आरोग्य-समृद्धीसाठी नरकचतुर्दशी पुजनाला विशेष महत्व आहे. या दिवशी अभ्यंग स्नान देखील केले जाते.

Diwali Festival 2022

नरक चतुर्दशी पुजनानंतर लक्ष्मी- कुबेर पुजन केले जाते. लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी असावी यासाठी देवीचे मनोभावनेने पुजन या दिवशी भक्तगण करतात. यासह धनाची वृद्धी व्हावी म्हणून धनाचे पुजन केले जाते. यंदा पंचांगानुसार नरक चतुर्दशी अन् लक्ष्मी पुजन हे 24 ऑक्टोबरला एकाच दिवशी आहे.

वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा (पाडवा) सण साजरा केला जातो. यासह बहिण भावाच्या नात्याची गाठ घट्ट करणारी भाऊबीज देखील दिवाळीच्या पर्वात साजरी केली जाते. यंदा 26 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा (पाडवा) अन् भाऊबीज आहे.

Diwali Lamps

विशेष मुहूर्त

धनत्रयोदशी - 22 ऑक्टोबर 2022, शनिवार

* शुभ मुहूर्त - सकाळी 8.03 ते 9.20 पर्यंत

* लाभ अमृत मुहूर्त - दुपारी 1.51 पासून ते 4.35 पर्यंत

* लाभ मुहूर्त - सायंकाळी 6.12पासून ते 7.35 पर्यंत

* शुभ अमृत मुहूर्त - रात्री 9.18 पासून ते 12.14 पर्यंत

Diwali

लक्ष्मीपुजन - 24 ऑक्टोबर 2022, सोमवार

* अमृत मुहूर्त - सकाळी 6.37 पासून ते 7.54 पर्यंत

* शुभ मुहूर्त - सकाळी 9.31 पासून ते 10.47 पर्यंत

* लाभ अमृत मुहूर्त - दुपारी 3.18 ते 6.01 पर्यंत

* लाभ मुहूर्त - रात्री 10.51 पासून ते 12.14 पर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT