Diwali Festival Surya Grahan Solar Eclipse esakal
संस्कृती

Diwali Festival Yog 2022 : या दिवाळीला 65 वर्षानंतर जुळून आलाय हा विशेष योग, जाणून घ्या महत्व

सकाळ डिजिटल टीम

Diwali Festival Yog 2022 : अश्विन कृष्ण द्वितीया म्हणजेच वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी अन् लक्ष्मीपुजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज हे सण दिवाळीच्या पर्वात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दिवाळी हा हिंदू परंपरेचा एक अत्यंत महत्वपुर्ण सण आहे. त्यामुळे या पर्वातील प्रत्येक दिवस हा विशेष आहे. मात्र यंदाची दिवाळी ही अधिक विशेष आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या दिवाळीला 65 वर्षांनंतर एक विशेष योग जुळून आला आहे असे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे सांगतात. चला तर या विशेष योगाबद्दल जाणून घेऊया.

(Diwali Festival Surya Grahan Solar Eclipse Special Yog 2022 Muhurat spiritual significance)

या कारणामुळे 2 तिथी एकाच दिवशी

वसुबारसपासून सुरु होणारी दिवाळी यंदा 21 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशी, 24 ऑक्टोबरला नरकचतुर्दशी अन् लक्ष्मीपुजन आणि 26 ऑक्टोबरला बलिप्रतिपदा अन् भाऊबीज आहे. प्रत्येक सणाच्यामध्ये जे एक दिवसाचे अंतर आले आहे, यामुळे एकाच दिवशी दोन सण साजरे होणार आहे. याचे मुळ कारण मंहत अनिकेतशास्त्री सांगतात, याचा थेट संबंध हा ग्रहांच्या खगोलीय परिक्रमेशी आधारित आहे. पृथ्वी परिक्रमेच्या वेगात होणाऱ्या बदलांनुसार तिथीचा क्षय होतो आणि त्यामुळे एकाच दिवशी दोन तिथी आपल्याला दिसतात.

काय आहे 65 वर्षानंतर आलेला शुभ योग

महंत अनिकेतशास्त्री सांगतात, यंदाच्या दिवाळीला एक विशेष योग आहे जो 65 वर्षांनंतर आला आहे, अन् तो म्हणजे दिवाळीतील प्रमुख दिवस लक्ष्मीपुजनाच्या अमावस्या पर्वात येणारे खंडग्रास सुर्य ग्रहण. या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. दिवाळीतील लक्ष्मीपुजन हे कार्तिक अमावस्येला केले जाते. यंदा कार्तिक अमावस्येची तारीख 24 आणि 25 ऑक्टोबर या दोन दिवशी आहे. दिवाळीच्या पर्वात अन् तेही लक्ष्मीपुजनाला सुर्य ग्रहण येणे हा अत्यंत शुभ योग आहे. या काळात केलेल्या कुठल्याही कार्याचे फळ हे 100 पटीने मिळते. असा हा योग 65 वर्षानंतर आला आहे असे महंत देशपांडे सांगतात.

Solar Eclipse

ग्रहण काळाचे महत्व

सुर्यग्रहण या वर्षातील शेवटचे सुर्यग्रहण आहे. 25 ऑक्टोबर मंगळवार हे खंडग्रास सुर्यग्रहण आहे. हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे. ग्रहणाच्या स्पर्शकालापासून सुर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा असे महंत सांगतात. सुर्य ग्रहण काळ हा पवित्र काळ आहे मात्र त्याचे नियम पाळे आवश्यक आहे. या काळात अशौच कर्म, पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत. मात्र दान-धर्म, पुजा, जप-तप, स्नान करावे. असे केल्यास केलेल्या कर्माचे योग्य फळ प्राप्त होते असेही महंत अनिकेशास्त्री सांगतात.

* ग्रहणाचा स्पर्श दुपारी 4 वाजून 49 मिनीटांनी होईल.

* ग्रहणाचा मध्य दुपारी 5 वाजून 43 मिनीटांनी असेल.

* ग्रहण मोक्ष (सुर्यास्त) संध्याकाळी 6 वाजून 08 मिनीटांनी.

* ग्रहणाचा पर्वकाल 1 तास 19 मिनीटे राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT