Champakali Esakal
संस्कृती

Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

चंपाकळी म्हणजे चंपाकळीच्या आकाराची गोड खारी शंकरपाळी.

दिपाली सुसर

चंपाकळी म्हणजे चंपाकळीच्या आकाराची गोड खारी शंकरपाळी. ही विशेष प्रकारची शंकरपाळी दिसायला खूपच सुरेख दिसते व बनवायला खूपच सोपी आहे. विशेषतः लहान मुलांना ही फार आवडते. ह्यात तुम्ही वेगवेगळे रंग घालून आणखीन आकर्षक बनवू शकता. आपण दिवाळी स्पेशल खास पारंपरिक पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील चौथी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

साहित्य:

एक वाटी मैदा

एक वाटी साखर

एक चमचा तूप

केशरी रंग  चिमुटभर

मीठ चवीनुसार

पाणी गरजेनुसार

तेल  

कृती:

सर्वप्रथम एक वाटी मैदा पसरट भांड्यात घेऊन त्यावर 2-3 चिमुट मीठ घालावे. एक चमचा साजूक तूप घालून मैद्याला मोहन द्यावे आणि मैद्याची घट्ट कणीक मळावी. या कणकेला 30 मिनिटे झाकून ठेवावे. 30 मिनिटांनी कणकेच्या लाट्या बनवून बारिकसर गोल लाटून घ्याव्या. त्या गोल पोळीला चौकोनी आकारात कापावे. त्यानंतर चौकोनी पुरीला पूर्ण कट न करता आतल्या आत काप करावे. त्यानंतर जाळी सारखा भाग तयार होईल. त्यानंतर आयताकृती घडी करून आत असलेल्या कापांना फुलाच्या पाकळीचा आकार देण्यासाठी दोन भागात विभागावे. पाकळीचे दोन्ही टोक व्यवस्थित घडी करावे. तापलेल्या तेलात मंद फ्लेमवर पाकळ्या सोनेरी होईपर्यंत तळाव्या आणि साखरेच्या पाकात 10 मिनिटे ठेवाव्या.

चंपाकळीसाठी पाक कसा बनवावा?एकवाटी साखर भांड्यात घ्यावी. साखर भिजेल इतके पाणी त्यात ओतावे आणि त्याचा एकतारी पाक बनवावा. (पाक एकतारी झाला आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पाकाचा एक थेंब बोटावर घेऊन त्याला पिंच करून बघावे दोनही बोटांच्या मध्ये पाकाची एक तार तयार झाल्यास तो एकतारी पाक होतो.) पाक तयार झाल्यावर केसरी रंग घालावा. अश्या पद्धतीने चंपाकळी अगदी खुसखुशीत बनते आणि तुम्ही सुद्धा दिवाळीत ही सोपी पद्धत वापरून चंपाकळी घरच्या घरी बनवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT