Shravan 2022: Dont Do these five things in Shravan month esakal
संस्कृती

Shravan 2022: श्रावण महिन्यात चुकूनही करू नका 'या' ५ गोष्टी, तुमचे व्रत ठरेल व्यर्थ

येत्या श्रावण महिन्यात या चूका परत होऊ नये म्हणून महिलांनी आवर्जून काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक सोमवार व्रत करतात. यासोबतच महादेवाला प्रिय असणारी बेलाची पानं, भांग, गंगाजल,दूध,चंदन, भस्म इत्यादी सामग्री महादेवाला अर्पण करतात.(Shravan) उत्तर भारतात श्रावण महिना आजपासून सुरू झालाय. महाराष्ट्रात येत्या २९ तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिन्याच्या पूजेचं महत्व खूप मोठं आहे. अनेकदा महिला महादेवाची पूजा करताना नकळत काही चूका करतात. मात्र येत्या श्रावण महिन्यात या चूका परत होऊ नये म्हणून महिलांनी आवर्जून काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. (Shravan 2022: Dont Do these five things in Shravan Month)

पूजेत हळदीचा वापर करू नका - शिवलिंग पुरूषतत्वाशी संबंधित असल्याने महादेवाची पूजा करताना शिवलिंगावर हळद चढवू नका. बेलाची पानं, भांग, गंगाजल,दूध,चंदन, भस्म इत्यादी सामग्रीचा वापर तुम्ही पुजेत करू शकता.

शिवलिंगाला स्पर्श करू नका - शास्त्रानुसार महिलांनी शिवलिंगाला हात लावू नये. असं मानलं जातं की, शिंवलिंगाला महिलांनी हात लावला की पार्वतीला राग येतो.

काळ्या रंगाचे वस्त्र घालू नका - श्रावण महिन्याचं व्रत तुम्ही करत असाल तर चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. काळा रंग नकारात्मकतेचं प्रतिक असतं. महादेवाची पुजा करताना लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे शुभ मानल्या जातात. तसेच श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे घालणंही शुभ मानल्या जातं.

श्रावण महिन्यात टाळा हे पदार्थ - श्रावण महिन्याच चुकूनही वांगे,पालेभाज्या,लसूण,कांदे आणि मास-मटण खाऊ नका. या महिन्यात आहारात सात्विक जेवण घ्या.

वाईट विचार मनात आणू नका - कुठलेही व्रत करताना ते शांत चित्ताने सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून करावे . श्रावण महिन्यात कोणाच्या चुगल्या करू नका तसेच कोणाचा वाईट विचारही करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT