cultivating indigenous varieties sakal
संस्कृती

देशी वाण जोपासताना....

घटस्थापनेतील कुंभाभोवतीचे धान्य नवनिर्मितीचे प्रतीक आहे. मातीत बी रुजते, अंकुरते, त्याचे रोप होते. त्यातून पुढे अन्नधान्याची भरभराट होते. माती हे सृजनशीलतेचे रूप आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. साधना उमरीकर, (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना)

घटस्थापनेतील कुंभाभोवतीचे धान्य नवनिर्मितीचे प्रतीक आहे. मातीत बी रुजते, अंकुरते, त्याचे रोप होते. त्यातून पुढे अन्नधान्याची भरभराट होते. माती हे सृजनशीलतेचे रूप आहे. आपणही नवनवीन गोष्टींचा ध्यास घेतला पाहिजे. नवनिर्मिती केली पाहिजे व ती जोपासलीही पाहिजे, असा संदेश यातून मिळतो.

गहू : शास्त्रीय नाव : Triticum aestivum

आयुर्वेदाच्या दृष्टीने गहू प्रशीतक, वेदनाहारक, विरेचक, पौष्टिक आहे.

भारतात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन पंजाब व मध्य प्रदेशात होते.

बेकरी उद्योगात गव्हाचा सर्वात जास्त प्रमाणात वापर होतो.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) : प्रथिने १२.१ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ १.७ ग्रॅम, तंतूमय घटक १.९ ग्रॅम, कर्बोदके ६९.४ ग्रॅम, ऊर्जा ३४१ किलो कॅलरी, कॅल्शिअम ४८ मि. ग्रॅम, फॉस्फरस ३५५ मि. ग्रॅम, लोह ४.९ मि. ग्रॅम

ज्वारी : शास्त्रीय नाव : Sorghum bicolor

ज्वारीची भाकरी ही पचण्यास हलकी आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते.

पीठ, लाह्या, रवा, पापड, बिस्किटे, पोहे, हुरडा निर्मिती करतात.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) प्रथिने १०.४ ग्रॅम,, स्निग्ध पदार्थ १.९ ग्रॅम, तंतूमय घटक १.२ ग्रॅम, कर्बोदके ७२.६ ग्रॅम, ऊर्जा ३४९ किलो कॅलरी, कॅल्शिअम २५ मि. ग्रॅम, फॉस्फरस २२२ मि. ग्रॅम, लोह ४.१ मि. ग्रॅम

हरभरा : शास्त्रीय नाव : Cicer arietinum

प्रथिने, कार्बोहायट्रेट, जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत असणारे कडधान्य. त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा प्रकार आहेत.

लचकणे व संधिभंग यांवर शिजविलेल्या पानांचा लेप गुणकारी असतो.

देशी चण्याची डाळ करतात. डाळीचे खमंग पदार्थ लोकप्रिय आहेत.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) : प्रथिने १७.१ ग्रॅ., स्निग्ध पदार्थ ५.३ ग्रॅ., कार्बोहायड्रेटे ६०.९ ग्रॅ., ऊर्जा ३६० किलो कॅलरी कॅल्शिअम २०२ मिग्रॅ., फॉस्फरस ३१२ मिग्रॅ.,लोह ४.६मिग्रॅ.

करडई : शास्त्रीय नाव : Carthamus tinctorius

पाने चवीला कडवट असून ती पाचक आहेत. कोवळ्या पानांची भाजी करतात. पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व, फॉस्फरस व कॅल्शिअम असते.

तेल सौम्य रेचक असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर लावतात.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) : करडई बिया ः प्रथिने- १३.५ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ २५.६ ग्रॅम, तंतूमय घटक ३४.९ ग्रॅम, कर्बोदके १७.९ ग्रॅम, ऊर्जा ३५६ किलो कॅलरी, कॅल्शिअम २३६ मि. ग्रॅम, फॉस्फरस ८२३ मि. ग्रॅम, लोह-४.६ मि. ग्रॅम

मका : शास्त्रीय नाव : Zea mays

आइस्क्रीम व पुडिंग तयार करण्यासाठी आणि कपड्यांना झिलई देण्यासाठी उपयोग होतो.

मॅग्नेशिअम आणि लोह असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) : प्रथिने ११.१ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ३.६ ग्रॅम, तंतूमय घटक २.७ ग्रॅम, कर्बोदके ६६.२ ग्रॅम, ऊर्जा ३४२ किलो कॅलरी, कॅल्शिअम १० मि. ग्रॅम, फॉस्फरस ३४८ मि. ग्रॅम, लोह २.३ मि. ग्रॅम

मोहरी : शास्त्रीय नाव : Brassica juncea

मोहरीमध्ये पांढरी मोहरी, पिवळी मोहरी, काळी मोहरी, तेलाची मोहरी आणि भाजीची मोहरी अशा जाती आहेत.

संधीवात, कंबरदुखी, लकवा यावर मोहरीचे तेल फार गुणकारी आहे. तेल उष्ण असल्याने वाताचे शमन होते.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) प्रथिने - २० ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ३९.७ ग्रॅम, तंतूमय घटक १.८ ग्रॅम, कर्बोदके २३.८ ग्रॅम, कॅल्शिअम ४९० मि. ग्रॅम, फॉस्फरस ७०० मि. ग्रॅम, लोह ७.९ मि. ग्रॅम

जवस : शास्त्रीय नाव : Linum usitatissimum

तेलामध्ये ५८ टक्के ओमेगा-३ मेदाम्ल आणि अँटिऑक्सिडंट हे घटक असतात. हे दोन्ही घटक रक्तदाब, तसेच कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराईडचे प्रमाण कमी करतात.

पेंड जनावरांसाठी पौष्टिक असते.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) प्रथिने २०.३ ग्रॅम, फॅट्स ३७.१ ग्रॅम, फायबर ४.८ ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स २८.९ ग्रॅम, ऊर्जा- ५३० किलो कॅलरी, कॅल्शियम १७० मिली ग्रॅम, फॉस्फोरस ३७० मिली ग्रॅम, लोह २.७ ग्रॅम.

तीळ : शास्त्रीय नाव : Sesamum indicum

तेलामध्ये ओमेगा ६ मेदाम्ले असतात. मुळे, पानांचा अर्क केसांच्या वाढीसाठी व ते काळे करण्यासाठी वापरतात. मूळव्याध, व्रण, भाजणे व हगवण अशा विकारांत तिळाचे तेल उपयोगी असते.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) प्रथिने १८.३ ग्रॅम, फॅट्स ४३.३ ग्रॅम, तंतूमय घटक २.९ ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स २५.० ग्रॅम, कॅल्शिअम १४५० मिलि ग्रॅम, फॉस्फरस ५७० मिली ग्रॅम, लोह ९ ग्रॅम.

सूर्यफूल : शास्त्रीय नाव : Helianthus annuus

तेलामध्ये जीवनसत्त्व ‘ई’चे प्रमाण सर्वाधिक आढळते.

टरफलापासून पेक्टीन, अल्कोहोल, फुरफुरॉल इ. रसायने असतात.

पौष्टिक घटक (प्रती १०० ग्रॅम) प्रथिने १९.८ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ५२.१ ग्रॅम, तंतूमय घटक १ ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स १७.९ ग्रॅम, ऊर्जा ६२० किलो कॅलरी, कॅल्शिअम २८० मिली ग्रॅम, फॉस्फरस ६७० मिली ग्रॅम, लोह ५ ग्रॅम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Homes Set on Fire in Bangladesh: बांगलादेशात हिंदू नागरिकांना कोंडून बाहेरून घरांना लावली आग; भयानक घटनेचा व्हिडिओ आला समोर

BMC Election: महायुतीत नाराजी स्फोट! शिंदे गटात राजीनाम्यांची मालिका, भाजपमध्येही समाज माध्यमावर खदखद

Banking Job Vacancies: बँक ऑफ इंडियात पदभरती; 514 जागांसाठी जाहिरात निघाली, वाचा डिटेल्स

PMC Election Nominations : धनकवडी–सहकारनगर कार्यालयात उमेदवारांची गर्दी; ५९ जणांचे नामनिर्देशन अर्ज दाखल!

Latest Marathi News Live Update : - छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या समर्थकांच्या भाजपविरोात घोषणा अन् युती तोडण्याची मागणी

SCROLL FOR NEXT