Dream Astrology sakal
संस्कृती

Dream Astrology : स्वप्नात जर होळी किंवा हे रंग दिसेल तर तुमच्या लव्ह लाईफवर होणार थेट परिणाम

आज आपण स्वप्नात जर होळी किंवा काही ठराविक रंग दिसेल तर तुमच्या लव्ह लाईफवर काय परिणाम होणार या विषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Dream Astrology : प्रत्येक व्यक्तीला रात्री झोपताना स्वप्न पडते. काही लोकांना कधी कधी स्वप्न पडतं तर काही लोकांना दररोज स्वप्न पडतं. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नामागे काही ना काही कारण असतं. हे स्पप्ने भविष्यात घडणाऱ्या गोष्टीला सुचित करतात.

स्‍वप्‍नशास्‍त्रात अशा स्वप्नांचे शुभ-अशुभ अर्थ सांगितले आहे. आता होळी जवळ आहे त्यामुळे सांगु इच्छिते की होळीच्या संदर्भात पडणाऱ्या स्वप्नांमागेही खूप मोठा अर्थ असतो. आज आपण स्वप्नात जर होळी किंवा काही ठराविक रंग दिसेल तर तुमच्या लव्ह लाईफवर काय परिणाम होणार या विषयी जाणून घेणार आहोत. (Dream Astrology if you seem these colors and holi in dream read its effect on your love life)

​स्वप्नात जर होळीचं दहन दिसत असेल तर : स्वप्नात जर होळी जळताना दिसत असेल तर याचा खुप खास अर्थ होत असतो. या स्वप्नाचा अर्थ असा असतो की तुमच्या आयुष्यातील लवकरच समस्या आणि अडचणी दूर जाणार आहे.

स्वप्नात होळी खेळताना दिसले तर : स्वप्नात जर होळी खेळताना दिसले तर त्याचा अर्थ होतो की लवकरच तुमच्या आयुष्यात शुभ गोष्टी होणार आहे. विशेष म्हणजे याचा संबंध तुमच्या आयुष्यातील नात्यांवर होतो. जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला पार्टनर मिळू शकतो.

स्वप्नात स्वत:ला गुलाबी रंगाने होळी खेळताना पाहिले तर : स्वप्नात स्वत:ला गुलाबी रंगाने होळी खेळताना पाहणे, शुभ संकेत असतो. यामुळे आयुष्यात प्रेम वाढत जातं

स्वप्नात लाल रंग दिसत असेल तर : स्वप्नात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या मार्गात अडचणी येऊ शकतात.

स्वप्नात काळा रंग दिसत असेल तर : स्वप्नात जर तुम्ही काळ्या रंगाने होळी खेळताना दिसणे शुभ नसते. अडचणी येणार असल्याचे संकेत असतं. असं स्वप्न पडलं तर सावध राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT