Dasara festival 2022  sakal
संस्कृती

Dasara 2022 : दसऱ्याच्या शुभेच्छा शोधताय?; इथे आहेत हटके मराठी संदेश!

विजयादशमीला श्री रामांचा विजय आणि दुर्गा पूजेतील शेवटचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

सध्या नवरात्र सुरू असून लवकरच विजयादशमी साजरी केली जाईल. विजयादशमीला श्री रामांचा विजय आणि दुर्गा पूजेतील शेवटचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीमध्ये या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. पूर्वी सगळे पाहुणे मंडळी एकत्र येऊन सण साजरे करायचे. लहान मुले, भरलेले घर, आंगणातील रांगोळी, गोडधोड जेवण, याची रेलचेल असायची. पण, आता कोणालाही वेळ नसतो. 

आपण कामाचा व्याप इतका मागे लावून घेतला आहे की, एकमेकांना शुभेच्छा द्यायला पण आपल्याला वेळ नसतो.  त्यामुळे सण आणि शुभेच्छा व्हर्च्युअल झाल्या आहेत. सरा शुभेच्छा संदेश, दसरा शुभेच्छा स्टेटस, घेऊन आलो आहोत.जे तुम्ही आपल्या मित्रांना व परिवारातील प्रियजनांना त्यांच्या दसरा शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुक वर पाठवुन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी काही खास संदेश पाहूयात.

आपट्याची पान, झेंडूच्या फुलांचा वास, आज आहे दिवस खूप खास, तुला सर्व सुख लाभो या जगात, प्रेमाने भेटूया आपण या दसऱ्यात. 

सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू यशाचे शिखर, प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!! दसऱ्याचा शुभेच्छा!

आपट्याची पाने जणू सोन बनून सोनेरी स्वप्नाच प्रतीक होऊ दे आकाश झेप घेण्याच ध्येय तुझ यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…एवढा मी श्रीमंत नाही…पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली…त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…सदैव असेच राहा…HAPPY DASEHRA

समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा हसरा सण सोने लुटून हे शिलंगण हर्षाने उजळू द्या अंगण सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!

स्नेहभाव वाढवू अनं प्रफुल्लित करु मन…सुवर्ण पर्ण वाटायचे..अन् सुवर्ण क्षण साठवायचे..मनामध्ये जपून आपुलकी एकमेकांना भेटायचे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात विजया दशमी चा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा आपल्या जीवनात पाऊस पडो सुवर्णांचा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत, अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT