Dussehra 2025

 

esakal

संस्कृती

Dussehra Shubh Muhurat 2025 : दसरा पूजनाची सर्वोत्तम वेळ कधी, अन् रावण दहनानंतर कोणतं काम करावं?

Best Time for Dussehra Puja in 2025 : विजय मुहूर्ताच्या काळात केलेले कोणतेही नवीन किंवा शुभकार्य बहुविध परिणाम देते असे मानले जाते.

Mayur Ratnaparkhe

Dussehra Rituals best time : नवरात्रीचा नववा दिवस कन्या पूजनानंतर संपतो आणि यानंतर दसरा दहाव्या दिवशी साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी म्हणूनही ओळखला जाते. हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे. शतकानुशतके, या दिवशी रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे, याशिवाय या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते.

 दरवर्षी, हा सण आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी येतो. विजयादशमीलाच दुर्गा देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला होता म्हणून देवीचे वर्णन महिषासुरमर्दनी असाही केला जातो. तर अनेक ठिकाणी दसऱ्याला देशभरात संध्याकाळी रावणाचे दहन केले जाते. याच पार्श्वभूमीवर या वर्षी रावण दहन आणि शस्त्र पूजनाचा शुभ मुहूर्त कधी असेल ते जाणून घेऊया.

हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी दशमी तिथी बुधवार, १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ०२ मिनिटांनी सुरू होईल आणि दशमी तिथी दुसऱ्या दिवशी, गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ०२ मिनिटांनी संपेल. शास्त्रीय नियमानुसार, उदय तिथी २ ऑक्टोबर रोजी येत असल्याने, संपूर्ण दिवस दशमी तिथी मानला जाईल. परिणामी, दसरा २ ऑक्टोबर रोजी असणार आहे.

दसरा पूजनाची सर्वोत्तम वेळ? -

दसरा पूजनासाठी सर्वोत्तम वेळ २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ०९ मिनिटांनी ते २ वाजून ५६ मिनटांपर्यंत असेल. यावेळी शस्त्र पूजन करणे सर्वात शुभ मानले जाते. विजय मुहूर्ताच्या काळात केलेले कोणतेही नवीन किंवा शुभकार्य बहुविध परिणाम देते असे मानले जाते. असे म्हटले जाते की, या दिवशी सर्व दहा दिशा खुल्या असतात. म्हणून, या शुभ काळात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता किंवा नवीन वस्तू खरेदी करू शकता.

रावण दहनाची सर्वोत्तम वेळ कधी? -

रावण दहनासाठी सर्वोत्तम वेळ गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात संध्याकाळी ६ वाजून ०६ मिनिटांनी ते ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल. यावेळेत रावण दहन करणे उत्तम आहे, परंतु अपवादात्मक परिस्थितीत, रावण दहन संध्याकाळी ७ वाजून ४५ पर्यंत देखील करता येते.

तर असं मानलं जातं की, रावण दहनानंतर उरलेले लाकूड किंवा राख घरी आणून अशा ठिकाणी ठेवावी जिथे कोणीही ते पाहू शकणार नाही. या पद्धतीचा अवलंब केल्याने घरातून  नकारात्मक ऊर्जा कायमची दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. शिवाय, यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vani News : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या कीर्तीध्वजाची भव्य मिरवणूक.. गडाच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तीध्वज डौलात फडकणार....

वेळापत्रक आरक्षणाचे! झेडपीच्या गटाची अन्‌ पंचायत समित्यांच्या गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; जिल्हाधिकारी पाठविणार एससी, एसटी प्रवर्गातील जागांचा प्रस्ताव

IND vs WI, 1st Test: 'कर्णधार' गिलच्या भारतातील पहिल्याच कसोटीवर पावसाचे काळे ढग? जाणून घ्या हवामान अंदाज

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

Kamaltai Gawai : आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला जाणार की नाही? कमलताई गवईंनी केले स्पष्ट; म्हणाल्या- आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित पण...

SCROLL FOR NEXT