Ganesh Chaturthi 2023 Sakal
संस्कृती

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला? जाणून घ्या कथा

आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म कसा झाला होता? काय आहे यामागील कहाणी?

Harshada Shirsekar

Ganesh Chaturthi 2023 : आपल्या लाडक्या बाप्पाचे काही दिवसांतच घराघरांत, मंडळांमध्ये आगमन होणार आहे. यानिमित्ताने बाजारपेठाही सजल्या आहेत. तिथीनुसार 19 सप्टेंबरला बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 

यानंतर पुढील 10 दिवस भक्तगण लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करतील. पौराणिक मान्यतांनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला भगवान गणेशाचा जन्म झाला होता.  लाडक्या बाप्पाचा हा उत्सव देशभरात विधिवत आणि जल्लोषात साजरा केला जातो. पण आपल्या बाप्पाचा जन्म कसा झाला, याबद्दल  कथा जाणून घेऊया. 

गणपत्ती बाप्पाचा जन्म असा झाला होता?  

एकदा माता पार्वतीने स्नान करण्यास जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या शरीराच्या मळापासून एक सुंदर बालकाची निर्मिती केली आणि त्यास गणेश असे नाव दिले. पार्वतीने या बालकास आदेश दिला की मी आंघोळ करण्यास जात आहे. त्यामुळे कोणासच स्नानागारात प्रवेश देऊ नये. 

…अन् गणेशानं भगवान शंकरांना रोखले

यानंतर जेव्हा भगवान शंकर तेथे आले, तेव्हा बालकाने भगवान शंकराला आतमध्ये प्रवेश करण्यास रोखले आणि म्हटले की, ‘आतमध्ये माझी आई आंघोळ करत आहे, त्यामुळे आपण प्रवेश करू शकत नाही’.

यावर भगवान शंकराने गणेशाला खूप समजावले की पार्वती माझी पत्नी आहे. पण गणेशने त्यांचे काहीही ऐकले नाही आणि यामुळे भगवान शंकरांना खूप राग आला व त्यांनी गणेशाचे शीर त्रिशूळाने उडवले आणि त्यांनी माता पार्वतीच्या स्नानागार कक्षेत प्रवेश केला.

माता पार्वती झाली क्रोधित 

जेव्हा माता पार्वतीने भगवान शंकरांना पाहताच विचारले, ‘आपण आतमध्ये कसा प्रवेश केला? मी तर गणेशाला आतमध्ये कोणालाही प्रवेश न देण्याचे सांगितले होते. तेव्हा भगवान शंकराने म्हटलं की मी त्याचे शीर त्रिशूळाने उडवले.

हे ऐकताच माता पार्वतीने रौद्ररूप धारण केले आणि माझ्या पुत्राला जिवंत केल्यानंतरच मी येथून बाहेर येईन अन्यथा येणार नाही, असे सांगितले. भगवान शंकराने माता पार्वतीची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काहीही ऐकले नाही.

श्री गणेशाला मिळाले वरदान 

सर्व देवीदेवता एकत्रित आले, सर्वांनीच माता पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला पण याचा काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा शंकराने भगवान विष्णूस सांगितले की, अशा मुलाचे शीर घेऊन या, ज्याची आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली असेल.

यानुसार विष्णू भगवानाने लगेचच गरूडांना तसे आदेश दिले. गरूड यांनी बराच शोध घेतल्यानंतर त्यांना एक हत्तीण दिसली, जी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपली होती.  गरूडांनी लगेचच हत्तीच्या पिल्लाचे शीर भगवान शंकरांना आणून दिले.   

यानंतर महादेवानं गणेशाला हत्तीचे शीर लावले आणि त्याला जीवदान दिले. इतकंच नव्हे तर श्री गणेशाला वरदानही दिला आजपासून कोणत्याही महत्त्वाच्या कार्याआधी सर्वप्रथम गणेशाची पूजा होईल. म्हणूनच कोणतेही कार्य करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Card : रेशनकार्डमधून १.१७ कोटी लोकांची नावे वगळणार, केंद्राने राज्यांना पाठवली यादी; तुमचं नाव तर नाही ना ?

Pune Traffic : सिंहगड रस्तावासीयांना पुन्हा मनस्ताप; पाऊस, प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहतूक कोंडी

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT