Ganeshotsav 2022 esakal
संस्कृती

Ganeshotsav 2022 | जळगाव : गणेशोत्सवात यंदा 18 फूट उंचीच्या मूर्ती

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायांच्या आगमनाला अवघे २५ दिवस उरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायांच्या आगमनाला अवघे २५ दिवस उरले आहेत. यंदा कोरोनोचे निर्बंधमुक्त गणेशोत्सव असल्याने गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. सोबतच मोठ्या उंचीच्या मूर्तींवर निर्बंध नसल्याने शहरात १० ते १८ फूट उंचीपर्यंत मूर्ती तयार करण्याच्या कामांना वेग आला आहे. लहान मूर्तींना तर रंगरंगोटीही सुरू झाली आहे. मोठ्या गणेश मंडळांनी आरास तयार करण्यासाठी मंडप उभारणीही सुरु केली आहे. (Latest Marathi News)

शहरात सुमारे आठ ते दहा ठिकाणी मूर्ती तयार करण्याचे कामे सुरू आहेत. मूर्तिकार सर्वसाधारण अर्धाफुटापासून पाच-सहा फूट उंचीपर्यंत मूर्ती तयार करीत आहेत. ज्या गणेशमंडळांनी यंदा मोठी आकर्षक मूर्ती तयार करण्याची ऑर्डर मूर्तिकारांना दिली आहे. तेच मूर्तिकार मोठी मूर्ती घडवीत आहे. काही गणेश मंडळांनी मध्यप्रदेश, शेगाव येथे मूर्ती आणण्यावर भर दिला आहे. ते जसजसा गणेशोत्सव जवळ येईल, तसतशा मूर्ती आणणे सुरू होईल, अशी माहिती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.

दरात दहा टक्के वाढ

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमतींवर जीएसटी लागू आहे. यामुळे मूर्ती घडविण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामतः मूर्तीच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती मूर्तिकार गणेश यादव यांनी दिली. कोरोना काळातच मूर्तीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र किमती वाढविण्यात आल्या नव्हत्या. यंदा मात्र सर्वच निर्बंधमुक्त असल्याने गणेशमूर्तीची अधिक विक्री होणार असल्याने मूर्तिकार व त्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

आरोग्याच्या जनजागृतीवर देखावे

कोरोना काळात अनेकांनी आपल्या घरातील कर्ते गमाविले आहेत. पैसा असूनही तब्येतीपुढे कोणाचे चालत नसल्याचा मोठा संदेश कोरोना महामारीने दिला. यामुळे बहुतेक गणेश मंडळांचा यंदा आरोग्याबाबत जनजागृतीवर भर असणार आहे. ‘आरोग्यम्‌ धन संपदा’ या उक्तीप्रमाणे गणेश मंडळांनी जनजागृतीवर आरास तयार करण्यास सुरवात केली आहे. कोरोना काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व पटले आहे. यामुळे झाडे लावा झाडे जगवा असा संदेशही देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT