Ganpati 2022 Esakal
संस्कृती

Ganpati 2022: बाप्पाला वाहल्या जाणाऱ्या ‘दुर्वां’चे हे आहे खास आरोग्यदायी महत्त्व

दुर्वा या एक प्रकारचं औषधी गवत असतात. या दुर्वांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यासाठी त्या नक्कीच हितकारक असतात.

दिपाली सुसर

Ganesh Chaturthi 2022 August Date: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्या महिन्यात त्या देवतांची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात. यावेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट म्हणजे बुधवारी आहे. बुधवार असल्याने गणेश चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. बुधवार हा गणपतीला समर्पित असून या दिवशी गणेश चतुर्थी असल्याने या दिवशी उपवासाचे विशेष महत्त्व आहे.

आता सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. खरंतर बाप्पासाठी सजावट, मखर, नैवेद्य, आरतीची तयारी याची लगबग सुरू होते. गणपती बाप्पाच्या पुजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे ‘दुर्वां’ना. गणेश पुजनात बाप्पाला खास 21 दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे.

असं म्हणतात की, पुराणात अनालसुराला गिळून गणपतीने देवांची असूरांपासून सुटका केली होती. मात्र या असूराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला. तेव्हा गणपतीच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्यामुळे त्याला आराम मिळाला होता. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत सुरू झाली. शिवाय बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत असंही म्हटलं जातं.

या काल्पनिक कथेमधील सत्य जरी आपल्याला ठाऊक नसलं तरी दुर्वा आपल्या जीवनात वरदान नक्कीच आहेत. दुर्वा या एक प्रकारचं औषधी गवत असतात. या दुर्वांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यासाठी त्या नक्कीच हितकारक असतात.

चला तर मग दुर्वांचे आरोग्यदायी फायदे कोणकोणते आहेत याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहू या..

दुर्वांमुळे त्वचाविकार दूर होतात.

आजकाल धुळ, माती, प्रदूषण, वातावरणात होणारे बदल, आहाराबाबत असलेल्या चुकीच्या सवयी यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होत असतो. जर तुम्हाला अंगावर पुरळ येत असेल, रॅशेस आले असतील आणि त्यामुळे त्वचेचा दाह होत असेल तर तुम्ही दुर्वांचा वापर करू शकता. कारण दुर्वांमध्ये अॅंटिसेप्टिक आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचे हे त्वचा विकार यामुळे नक्कीच कमी होऊ शकतात. यासाठी दुर्वांची पाने स्वच्छ करून त्याची वाटून पेस्ट तयार करा आणि त्वचेच्या ता भागावर लावा.


दुर्वां या डोळ्यांच्या आजारावरही उपयुक्त आहेत.

डोळ्यांसाठी दुर्वा फारच गुणकारी असल्याचं म्हटलं जातं. जर तुम्हाला सतत डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे दुखत असल्यामुळे झोप न येणं असा त्रास होत असेल तर तुम्ही एका कापडात दुर्वा गुंडाळून तुम्ही ती त्या कापडाची पट्टी डोळ्यांवर बांधून ठेवू शकता. दुर्वांचा स्पर्श झाल्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या समस्या नक्कीच कमी होऊ शकतात.

दुर्वांमुळे सततची डोकेदुखी होते.

दूर अनेकांना सतत डोकेदुखीचा त्रास जाणवत असतो. कामाचा ताण, सततची दगदग, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. मात्र डोके दुखत असल्यास अनेकजण एखादी पेनकिलर अथवा डोक्यावर बाम लावतात. ज्याची पुढे त्यांना एकप्रकारे सवयच लागते. जर तुम्हाला डोकेदुखीपासून आराम हवा असेल तर दुर्वांची पाने वाटून त्याचा लेप डोक्यावर लावल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. शिवाय याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर नक्कीच होत नाही.


तोंड आल्यास दुर्वांचा असा करा उपयोग

अनेकांना उष्णतेमुळे तोंड येणं, तोंडात फोड अथवा अल्सर होण्याचा त्रास होत असतो. बऱ्याचदा यावर अनेक उपाययोजना करूनही काहीच परिणाम होत नाही. कारण हा त्रास वारंवार होतच राहतो. तोंड येणे अथवा तोंडातील अल्सरच्या समस्येमुळे खाताना अथवा पाणी पिताना खूप त्रास जाणवतो. बोलणे, तोंड स्वच्छ करणे, खाणे अशा गोष्टी करणं कठीण जातं. अशावेळी दुर्वा स्वच्छ धुवून रात्रभर एका भांड्यांत पाणी घालून बुडवून ठेवाव्यात आणि सकाळी त्या पाण्याने चुळ भरावी. ज्यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT