Gudi Padwa News
Gudi Padwa News 
संस्कृती

Gudi Padwa 2022 : स्वागत करू 'या' मंगल क्षणाचे...!

सकाळ वृत्तसेवा

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. ब्रह्माने या दिवशी जगाची निर्मिती केली, असे मानले जाते. तसेच रावणाचा वध करून राम अयोध्येला याच दिवशी पोचले, असे मानले जाते. तसेच शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकाचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण केला व त्यांच्या साहाय्याने शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरू केली. या सर्व गोष्टी म्हणून घरोघरी गुढी उभारतात.

हा  मंगलमय प्रसंग म्हणजे नवीन कार्य सुरू करण्यासाठी, नवीन वस्तू आणण्यासाठी आणि शुभकार्य सुरू करण्यासाठी एक पर्वणीच असते. नवीन गृहप्रवेश हा त्यातलाच एक भाग. अनेक जणांना आपल्या घराचा ताबा या दिवशी हवा असतो; जेणेकरून नव्या आयुष्याची सुरवात नव्या घरातून करता येईल. पण तेवढेच पुरेसे नसते. ते योग्य प्रकारे सजविणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. गुढीपाडवाच्या मंगल दिवशी जर नवीन घरात प्रवेश करणार असाल तर ही सजावट अनिवार्य ठरते.

सणासुदीच्या दिवशी घराला सजावटीचा "पर्सनल टच' दिल्यास सणाचा आनंद द्विगुणित होतो. गुढीच्या सजावटीला शास्त्रीय आयाम असले तरी त्यात नावीन्य आणता येते. गुढी हल्ली बाजारात विकतदेखील मिळते. पण ती घेणे टाळावे. त्याने सणाचा "फील' जातो. तसेच ती गुढी तयार करण्यात एक वेगळी मजा असते. विकतच्या गुढीमध्ये ती मजा नाही आणि नवीन घरात आल्यावर तर त्याहून नाही. तेव्हा पहिला गुढीपाडवा या घरात साजरा करत असाल तर आपल्या हाताने गुढी उभारण्याचा आनंद घालवू नका.

हे झाले गुढीच्या सजावटीचे. आता घराच्या अंतर्गत सजावटीकडे वळूया. सणासुदीच्या दिवशी तर अंतर्गत सजावटीवर लक्ष दिले गेलेच पाहिजे. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नसते. साधे साधे उपाय करूनसुद्धा घर आकर्षक बनवता येते. कॉफी टेबल, किचन कॅबिनेट यासारख्या अनेक गोष्टी सजावटीसाठी उपयुक्‍त ठरू शकतात. झेंडूच्या फुलांच्या माळा ठिकठिकाणी सोडूनदेखील गुढीपाडव्याच्या सजावटीला एक नवा आयाम मिळू शकतो. दाराशी काढलेली सुंदर रांगोळी घराला एक वेगळा फील देऊ शकते. हल्ली वॉलपेपर लावायचीदेखील फॅशन आहे. या आणि अशा अनेक उपायांनी घराची सजावट करता येते. मंगलमय वातावरणनिर्मितीसाठी दिव्यांची नितांत आवश्‍यकता असते. हल्ली बाजारात अनेक प्रकारचे दिवे उपलब्ध आहेत. त्याचा सुयोग्य वापर करावा. घर नवीन असल्याने टाईल्स स्वच्छ असतीलच असे नाही. म्हणून एखादा गालिचा तेथे वापरू शकता. नवीन घर असूनदेखील खूप इंटेरिअर केले नसेल तरी साधेपणानेदेखील घराचे सौंदर्य वाढवता येते.

हे झाले घराच्या अंतर्गत सजावटीबद्दल. हल्ली टुमदार घर शहरात बघणे दुरापास्त आहे. पण आपले असे घर असेल तर मात्र घराच्या बाह्य भागाची सजावटदेखील करायला विसरू नका. जर फ्लॅटमध्ये राहात असाल तर गुढी बाल्कनीत उभारण्याशिवाय पर्याय नसतो. आपले स्वतंत्र घर असल्यास घराच्या गच्चीवर गुढी उभारावी. तसेच बाहेरून रंगरंगोटी केल्यास नव्या वर्षाची एकदम दणक्‍यात सुरवात होईल. घराची सजावट म्हणजे खूप भडक प्रकारचे इंटेरिअरच असायला हवे असे नाही; तर साध्या साध्या उपायांनीदेखील ही कला साधता येते. तेव्हा नवीन वर्षात नवीन घरात योग्य सजावट करून नवीन आयुष्य सुरू करता येईल.

Gudi Padwa Festival

गुढीपाडवा... नवसंकल्पाचे पर्व!

हिंदू नववर्षाची सुरवात... चैत्र मासारंभ... शालिवाहन शकाचा प्रारंभ... साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त... असे गुढीपाडव्याबद्दल सांगितले जाते. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्‍वाची निर्मिती केली, दधिची ऋषींच्या अस्थींचा वापर करून इंद्राने वृत्रासूराचा वध केला, रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र परत अयोध्येत आले ते याच दिवशी. या सगळ्या घटनांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व राहिले. निसर्गातील बदलांना सुरवात होते ते पाडव्याच्याच काळात. शुष्क झालेली वनसंपदा बहरते, पानगळ झालेल्या झाडांना हिरवी पाने येतात ती याच काळात... कोवळ्या लिंबाच्या झाडाची पाने, फुले खाऊन चटणी करावी आणि ती खाल्ली म्हणजे वर्षभर कोणतेही आजार होत नाहीत, हा आयुर्वेदीय संदर्भ सापडतो तो या दिवसावरच. अनेक संत-महात्म्यांच्या अभंग, साहित्यकृतीवरही गुढीपाडव्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. कारण हा दिवसच मुळात असतो चैतन्याचा, उत्साहाचा, आनंदाचा. संत चोखामेळा म्हणूनच म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी... वाट ही चालावी पंढरीची... याचाच अर्थ पंढरीला जाताना होणारा आनंद हा चोखामेळ्यांना गुढीपाडव्यासारखाच वाटतो. संत तुकारामांनी श्रीकृष्णाच्या लीला गाथेत वर्णन केल्या आहेत. त्यात अनेक ओव्यांमध्ये गुढीचा उल्लेख आहे.

"गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा,

बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी,

गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे.''

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत लिहिले आहे

"अधर्माचि अवधीं तोडीं दोषांचीं लिहिलीं फाडीं

सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवीं...''

या सगळ्या संदर्भाचा अर्थ एवढाच की गुढीपाडवा हा सण विजयाचे, सज्जनशक्‍तीचे, आनंदी क्षणाचे, विधायक कृतीचे प्रतीक आहे.

Gudi Padwa Festival

गुढी उभारण्याची परंपरा

प्रत्येक समाजामध्ये काही परंपरा या पूर्वापार चालत आलेल्या असतात. या परंपरा पाळणे न पाळणे हा प्रत्येकाचा व्यक्‍तिगत प्रश्‍न आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून सणाची तयारी करावी. सडा, रांगोळी काढून घराबाहेर स्वच्छ काठी धुऊन कलश, लिंबाची फांदी, वस्त्र, हार, आंब्याची पाने, साखरेची गाठी, हळदी-कुंकू अर्पण करून गुढी उभारावी ही परंपरा जुनीच. घरोघरी गुढ्या उभारल्या जातात, त्यातून आनंदोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोचविला जातो. गावागावांत हरिनाम सप्ताह, विविध धार्मिक कार्यक्रम, यात्रा महोत्सव सुरू होतात. नवीन वर्षात कसे सुखाने, कसे आनंदाने रहावयाचे याचा संकल्पच या दिवशी केला जातो. "सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष, मनोमनी दाटे नवीन वर्षाचा हर्ष' असे म्हणत नववर्षाचे स्वागत केले जाते. "निळ्या निळ्या आभाळी, शोभे उंच गुढी, नवे नवे वर्ष आले, घेऊन गूळ-साखरेची गोडी...' असे संदेश आधुनिक काळात मोबाईलद्वारे एकमेकांना पाठविले जातात. आपण नवीन वर्षात काही तरी करावयाचे म्हणतो, संकल्प निश्‍चित करतो ही निश्‍चिती उत्साही पर्वावर केली तर काय बिघडते... चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्‍वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात... अशा ओळीही गुढीपाडव्याचे महत्त्व सांगून जातात.

सामाजिक एकोप्याचा आशय

गुढीपाडव्याचा हा सण सामाजिक एकोपा कायम राहावा हेच सांगतो. कारण सगळ्यांनी गुढ्या उभारून स्वागत केले पाहिजे, याचा अर्थ कोणी एकट्याने करण्याचे हे काम नाही. समाजात कोणताही भेदभाव नाही. सर्वजण समान आहेत, समानतेच्या पातळीवरच असे उत्सव आम्ही साजरे करीत असतो. गुढी हे त्याचे झाले एक प्रतीक. पाडव्यापासून नवीन व्यवसायाचा आरंभ करणारे अनेकजण असतात. नवीन वस्तूंची खरेदी, नवीन वाहन, वास्तुप्रवेश असे कार्यक्रम या दिवशी केले जातात. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरांत नववर्षाच्या मिरवणुका काढून हा सण साजरा केला जातो. या मिरवणुकांत युवकांचा असणारा उत्साह, आकर्षक वेशभूषेत असणाऱ्या युवती, वेगवेगळ्या खेळांचे प्रदर्शन, समाजात असणाऱ्या विविध संघटनांचा सहभाग हे एकोप्याचेच दर्शन घडवितात. चैत्राचा महिना म्हणजे तसे म्हटले तर पावसाळ्याला राहतात फक्‍त दोन महिने. या दोन महिन्यांच्या काळात तयारी करावयाची ती खरिपाच्या हंगामाची. मशागत करणे, बी-बियाणे, खतांची खरेदी, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुरुस्ती ही कामे या कालावधीत केली जातात. गेल्या तीन-चार वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. यंदा तर त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लातूरसारख्या ठिकाणी मांजरा नदीचे खोलीकरण, सरळीकरणाची कामे सुरू होणार आहेत. अशीच कामे अन्य ठिकाणीही आयोजित करण्यात आली आहेत. शासनच नव्हे, तर विविध सामाजिक संस्था, समाजघटक दुष्काळाचे संकट मोडून काढण्यासाठी पुढे आले आहेत. या शुभमुहूर्तावर सुरू केलेल्या या कामांना यश मिळेल, हीच अपेक्षा.

गुढीपाडव्यासाठी ‘तनिष्क’चे खास दागिने

गुढीपाडव्याचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. यावर्षी २ एप्रिल २०२२ ला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. घरोघरी गुढी उभारून गोडाधोडाचा स्‍वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, मोठे देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते.

Tanishq

गुढीपाडवा साजरा करण्यामागील अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्र्वनिर्मिती केली, असे वेदात म्हटले आहे.

दागिने हा बाईच्या मनातला एक हळवा कोपरा आहे. दागिन्यांचे नाव घेतलं की स्त्री एकदम इमोशनल होते. कुठलीही स्त्री अगदी सुरेख खुलते. तिचा रंगरूप एकदम वेगळाच होतो. तिच्या चेहऱ्यावर तेज वाढणे ही पुष्टी आहे.

Tanishq

तनिष्कला महिलांना काय हवे आहे हे समजते आणि त्यांनी त्यांच्या गरजेनुसार दागिने बनवले. प्रत्येक भारतीय नववधूला दागिने वापर करताना खूप अभिमान वाटतो. संस्कार, मूल्ये आणि आचारविचार हे भारतीय वधूचे जग आहे. तिच्या दागिन्यांवरून भारतीय अभिमानाबद्दलची भावना आणि अभिमान दिसून येतो. या वेळी किंवा क्षणी मुलीला राजकन्येसारखे वाटते, ज्याला तिचा जीवलग सापडला आहे.

आजकाल प्रत्येक मुलीला हलके आणि ट्रेंडी सोन्याचे दागिने घालायचे असतात. हे लक्षात घेऊन लाँच केले आहे वजनाने हलके जे जड दिसते; परंतु पारंपरिक दागिन्यांमध्ये जसे की झुमके, मंगळसूत्र आणि तेही वाजवी दरात.

Tanishq

तनिष्कने सादर करताच रिवाहने लग्नाचे दागिने साजरे केले. जसे की कोल्‍हापूर साज, हे खूप अस्सल दागिने आहे, जे महाराष्ट्रीयन वधूद्वारे वापरले जातात तसेच शुद्ध सोन्यात तयार केले जाते. कोल्‍हापुरी साज हा भगवान विष्णूचा अवतार आणि मंगल अष्टाची चिन्‍हे दर्शवितो.

लोकप्रियतेत वाढ झाल्यामुळे दागिन्यांनी बनवलेल्या सुंदर वस्‍तू स्त्रिया दररोज किंवा अधूनमधून घालू लागल्या. मंगळसूत्र हे महाराष्ट्रीयन वधूमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. मध्यभागी लटकन आणि उगवलेली वती सौंदर्य आणि प्रेम, वधूमधील स्‍नेह निर्माण करते. ही काळ्या आणि सोनेरी मण्यांची तार त्यांच्यामध्ये प्रेमकथा तयार करते.

Tanishq

प्रत्येक दागिन्याच्या खरेदीवर मिळवा

एक सोन्याचे नाणे मोफत* ही ऑफर १ ते ३ एप्रिलपर्यंत

दागिने म्हटले की बांगड्या आणि तोडे आलेच. या अतिशय अस्‍सल प्रकारच्या बांगड्या नववधू लग्नात वापरतात. या सोन्याच्या बांगड्या सहसा लग्नात काचेच्या हिरव्या बांगड्यांसोबत परिधान केल्या जातात. या सर्व बांगड्या अतिशय शुभ आहेत आणि नववधूंनी परिधान कराव्यात. पाटल्या शुभ स्‍वस्‍तिक आणि इतर रचनांनी नक्षीकाम केलेले असू शकते. महाराष्ट्र तोडे आणि पाटल्यासाठी प्रसिद्ध आहे जे समृद्धी आणि जोडणीचे प्रतीक आहे. ग्राहकांसाठी प्रत्येक वेळी नवीन योजना सुरू केली जाते. १००% सोन्याची हमी देते. नेहमी जुन्या सोन्यासाठी सर्वोत्तम परतावा देते. इतर दुकानांतून आणलेले सोने अतिशय चांगल्या किमतीत बदलू शकता. तसेच ते इतर स्‍टोअरमधून खरेदी केलेल्या सोन्यासाठी खूप चांगला विनिमय दर देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT