Guru Gochar 2023 esakal
संस्कृती

Guru Gochar 2023 : गुरु संक्रमण बदलेल या 3 राशींचं भाग्य, करियर अन् व्यवसायात मिळेल जोरदार यश

या तीन राशींचे नशीब उजळणार असून करियर आणि व्यवसायाच्या बाबतीत विशेष लाभ प्राप्त होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Guru Gochar 2023 : ग्रहांच्या संक्रमणाच थेट परिणाम आपल्या दैेनंदिन जीवनावर होतो. गुरु संक्रमणाने काही राशींना विशेष लाभ होणार आहे. तसेच या तीन राशींचे नशीब उजळणार असून करियर आणि व्यवसायाच्या बाबतीत विशेष लाभ प्राप्त होणार आहे. या राशी कोणत्या ते आपण जाणून घेणार आहोत.

22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 5:14 वाजता गुरुचे राशी परिवर्तन होणार आहे. यानंतर, 4 सप्टेंबर रोजी गुरू मेष राशीमध्ये प्रतिगामी होईल. त्याच वेळी शनि आणि बुध देखील प्रतिगामी स्थितीत फिरतील. 31 डिसेंबर रोजी गुरू पुन्हा मेष राशीत फिरेल.

1 मे 2024 रोजी मेष सोडून ते वृषभ राशीत पोहोचेल. 22 एप्रिल 2023 रोजी गुरू सूर्य, राहू आणि बुध यांच्याशी प्रतिगामी गतीने भेटतील. मे महिन्याच्या मध्यात रवि परिवर्तन होईल आणि सतत वाढत असलेल्या राहूशी भेट होईल. या काळात काही राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल. 7 जूनपर्यंत बुधाला गुरूचा सहवास मिळेल. गुरूकडून मिळणारा पाठिंबा आणि ग्रहांच्या युतीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीवर विशेष राहील.

मेष - मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचा बदल विशेष असणार आहे, ज्यामुळे जबाबदाऱ्या, शुभ कार्य, वजन, व्यवसाय आणि नोकरीत बढती मिळेल. विवाहासाठी गुरूचे संक्रमण आनंदाची बातमी घेऊन येणार आहे, परंतु अजिबात घाई करू नका, अन्यथा नकारात्मक ग्रह तुमची फसवणूक करू शकतात. (Horoscope)

सिंह - गुरु मूळ त्रिकोण सक्रिय करतील. सिंह राशीच्या लोकांसाठी धर्म, नशीब आणि पित्याच्या ठिकाणी गुरु येत आहे. कारण, गुरू धर्माचा प्रचार करतात. अशा परिस्थितीत धार्मिक कार्यक्रम, शुभ कार्य आणि धार्मिक भेटींच्या प्रक्रियेला गती मिळेल. यावेळी गुरू भाग्यवृद्धी करतील, त्यामुळे कीर्ती आणि सामाजिक मान-सन्मान वाढेल. वडिलांची बढती होईल, तसेच त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Astrology)

धनु - या राशीचा स्वामी म्हणजेच गुरु पाचव्या स्थानात प्रवेश करणार आहे. येथे आल्याने गुरू बुद्धिमत्ता, मुले आणि उच्च शिक्षणाला चालना देईल. गुरू संक्रमणामुळे या स्थितीत तुम्हाला झेपेल तेवढाच ताण तुमच्या मेंदूला द्यावा. तसेच ज्यांना लहान बाळाची अपेक्षा आहे त्यांच्या घरी लवकरच गोड बातमी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT