Happy Gudi Padwa 2025 Wishes in Marathi esakal
संस्कृती

Gudi Padwa Wishes : उभारुन आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी...तुमच्या मित्रपरिवाराला द्या गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Happy Gudi Padwa 2025 Wishes in Marathi : गुढीपाडव्याच्या दिवशी जीवनात नवा उत्साह, समृद्धी आणि आनंद येतो. हा दिवस आपल्या मराठी संस्कृतीचा आणि हिंदू परंपरेचा सन्मान करण्याचा आहे.तुमचे नातेवाईक,मित्रमंडळी यांना द्या खास शुभेच्छा.

Saisimran Ghashi

Happy Gudi Padwa Marathi Wishes Message : गुढीपाडवा, हा फुललेल्या वसंत ऋतूचा आणि हिंदू नववर्षाचा प्रारंभ असलेला एक खास सण आहे. 2025 मध्ये गुढीपाडवा 29 मार्चला म्हणजेच उद्या साजरा केला जाईल. हा दिवस आपल्या जीवनात नवा उमेद, नवी आशा आणि नवा उत्साह घेऊन येईल. गुढीपाडवा म्हणजेच फाल्गुन महिन्याचा शेवट आणि चैत्र महिन्याचा प्रारंभ तसेच मराठी लोकांसाठी असलेला सर्वात महत्त्वाचा सण.

गुढीपाडवा साजरा करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे. घराच्या उंबरठ्यावर उभी केलेली गुढी. या गुढीची रंगबिरंगी साडी, रेशमी वस्त्र, तांब्या,कडूलिंबाची पाने आणि साखरमाळ. गुढी उभारणे म्हणजेच नवीन वर्षाच्या स्वागताची आणि प्रत्येकाच्या जीवनात नवा प्रारंभ घडवण्याची एक कृतज्ञता आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. या सणाच्या दिवशी नेहमीच पुरणपोळी, खीर, पुरिभाजी आणि अनेक खास पदार्थ घरांमध्ये तयार केले जातात. या पदार्थांचा स्वाद घेऊन लोक गुढीपाडवाचा उत्सव अधिक गोड करतात.

आपल्या प्रियजनांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाठवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही कास संदेश सुचवले आहेत. या शुभेच्छा केवळ नवा वर्षाचा प्रारंभ दर्शवतात, तर आपल्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि ऐतिहासिक परंपरांचा सन्मानही व्यक्त करतात. आम्ही दिलेल्या खास गुढीपाडव्याचे संदेश दिले आहेत जे तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला पाठवू शकता.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश

  1. पाडव्याची नवीन पहाट घेवून येवो तुमच्या जीवनात सुखाची लाट.
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  2. नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा,
    उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा…
    नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचं जीवन आनंद, समृद्धी आणि यशाने भरले जावो.

  3. उभारुन आनंदाची गुढी द्वारी,
    जीवनात येवो रंगत न्यारी.
    पूर्ण होवोत तुमच्या इच्छ-आकांक्षा,
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

  4. जल्लोष नवं वर्षाचा,
    मराठी अस्मितेचा,
    हिंदू संस्कृतीचा,
    सण उत्साहाचा.
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा केवळ एक सण नाही तर तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि समृद्धतेचा उत्सव आहे. हे नववर्ष आपल्यासाठी आनंद, प्रेम आणि यश घेऊन येवो आणि जीवनात नवा उजाळा घेऊन येवो. चला, या गुढीपाडव्याला एक नवीन सुरुवात करूया आणि तुमच्या प्रियजनांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरा.

आपल्या प्रत्येक क्षणात आनंद, समृद्धी आणि सुख असो! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT