Hasan Mushrif Astrology  esakal
संस्कृती

Hasan Mushrif Astrology : हसन मुश्रीफांचं कुणी काहीही बिघडवू शकत नाही, ज्योतिषी म्हणतात...

हसन मुश्रीफांची यंदाची संक्रात कशी असणार, याविषयी ज्योतिषी यांनी सांगितले आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Hasan Mushrif Astrology : कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल आणि पुणे येथील घरांवर ईडीच्या (ED Raids) अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. त्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहे. मुश्रीफांचं कोलकत्ता कनेक्शन असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीने दिली होती. अशातच हसन मुश्रीफांची यंदाची संक्रात कशी असणार, याविषयी ज्योतिषी यांनी सांगितले आहे.

हसन मुश्रिफ यांची रास कर्क आहे. अप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखानातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मात्र यंदाची संक्रांत मुश्रिफांसाठी चांगली ठरणार आहे. त्यांच्या कर्क राशीचा विचार करता हा कालखंड त्यांच्यासाठी चांगला असणार आहे. त्यांना कोर्टकचेरी कामात तूर्तास यश मिळेल.तसेच खटल्यातून त्यांना जामीनही मिळेल.

डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष वाचस्पती

यापूर्वीही हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती.

दरम्यान, मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत ईडी चौकशीला सहकार्य करणार असल्याची माहिती दिली. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांचा काहीही दोष नसतो. सरकारी अधिकारी कोणाच्या तरी सांगण्यावरुन येतात. असे सांगत मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT