Hindu Marriage Rituals esakal
संस्कृती

Hindu Marriage Rituals : नवरदेवाची वरात पांढऱ्या घोड्यावर नाही तर, घोडीवरच का निघते? जाणून घ्या लॉजिक

हिंदू लग्न पद्धतीनुसार अनेक प्रथांपैकी नवरदेवाची वरात घोडीवरून काढण्याची प्रथा आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Hindu Marriage Rituals :

प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात. रुढी परंपरांचे विशेष महत्व असते. अशीच एक प्रथा हिंदू विवाह पद्धतीत आहे, यात नवरदेवाची वरात घोडीवर काढली जाते. पण तुम्हाला हे माहित आहे का, की नवरदेवाची वरात घोडीवरच का निघते, घोड्यावर का नाही? यातही पांढऱ्या घोडीला विशेष प्राधान्य असते. पण असे का, जाणून घ्या.

असं म्हणतात रामायण-महाभारतापासून ही परंपरा पाळली जाते. तुमच्या, आमच्या पाहण्यातले अनेक जण घोडीवर बसले असतील किंवा भविष्यात बसणार असतील. हल्ली वेळेची, जागेची कमतरता, ट्रॅफीक जॅम यामुळे वराती लहान काढल्या जातात. जवळच्या मारुतीच्या मंदिरापर्यंत वरात काढण्याची पद्धत सध्या सुरु झाली आहे. पण तसेही असले तरी नवरदेवाला घोडीवर बसवलेच जाते.

घोडीवर बसण्याचं कारण काय?

वरातीत नवऱ्या मुलाला घोडीवर बसवले जाते याचा अर्थ मुलगा नव्या आयुष्याची सुरुवात करीत आहे. अशात तो वैवाहिक आयुष्याची जबाबदारी घेण्यास सक्षम असल्याचे हे चिन्ह समजले जाते.

पांढरीच घोडी का?

लग्नात नवरदेवाला पांढऱ्या घोडीवर बसवण्यास प्राधान्य असते. स्वप्नातला राजकुमार पांढऱ्या घोडीवर बसून घ्यायला येईल अशी परिकथाही रंगवल्या जातात. पण या पांढऱ्या रंगामागे शुद्धता, प्रेम, उदारता, शांतता, सौभाग्य आणि समृद्धीच प्रतीक असतं. या गुणांमुळे वैवाहिक आयुष्य आणखी समृद्ध होण्यास मदत मिळते. त्यामुळे नव्या आयुष्याची सुरुवात करताना पांढऱ्या घोडीला प्राधान्य दिलं जातं.

घोडीच का, घोडा का नाही?

घोडा रागीट असतो, असं म्हणतात. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय घोड्यावर स्वार होणे शक्य नसते. घोड्याच्या या चपळतेने पूर्वी घोडा युद्धभूमीत वापरा जात. पण लग्नाच्या वरातीत घोड्याच्या रागीट, चपळ व शक्तीवान या गुणांचा काहीही फायदा होत नाही.

उलट त्यागाला अधिक महत्व असते. घोड्याच्या तुलनेत घोडी शांतता प्रिय असते. त्यामुळे नवरदेवाला लग्नात घोड्यावर नाही तर घोडीवर बसवतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT