Hindu Rituals  sakal
संस्कृती

Hindu Rituals : झोपलेल्या व्‍यक्तिला ओंलाडणे का असतं अशुभ? हे आहे खरं कारण

आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Hindu Rituals : तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल की झोपलेल्या व्यक्तीला कधीच ओलांडून जाऊ नये. जर एखादा व्यक्ती झोपला असेल तर त्याला चुकूनही ओलांडून जाऊ नये. घरचे मोठ्यांच्या मते झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाणे अशुभ असतं.

एक मान्‍यता अशीही आहे की असं केल्याने व्यक्तीची लांबी किंवा उंची वाढणे कमी होतं तर याशिवाय यामागे महाभारतातील अनेक घटनांचा संबंध जुळलेला आहे. आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Hindu Rituals why should not cross sleeping person read reason )

भीमच्या रस्त्यात आले होते झोपलेले हनुमान जी 

महाभारतातील एका घटनेमध्ये एकदा महाबली भीम कुठे तरी जात होते आणि त्यांच्या वाटेत हनुमानजी वृद्ध माकडाच्या रुपात त्यांना रस्त्यावर झोपलेले दिसले. हनुमानजी यांना असे झोपलेले होते की त्यांच्या शेपूटमुळे रस्ता बंद झाला होता.

भीम ची इच्छा असती तर ते शेपूटला ओलांडून जाऊ शकत होते मात्र त्याने तसं केलं नाही आणि शेपूट बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भीमच्या प्रयत्नाला यश आले नाही. तेव्हा भीमला समजले की हे साधारण माकड नाही. त्यानंतर हनुमानजीने आपला परिचय दिला आणि आपलं खरं रुप दाखवलं आणि भीमला युद्धात विजयी होण्याचा आशीर्वाद दिला.

हनुमानजींनी जेव्हा महाबली भीमला विचारले की शेपूटला ओलांडून का गेले नाही तेव्हा भीम म्हणाले, 'या जगात सर्व प्राण्यांमध्ये ईश्वराचा अंश आहे. अशात प्राण्यांना ओलांडून जाणे हा देवाचा अपमान असेल. त्यामुळे तेव्हापासून ही परंपरा आहे की झोपलेल्या व्यक्तीला कधीच ओलांडू नये. असं केल्याने देवाचा अपमान होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT