Hindu Rituals esakal
संस्कृती

Hindu Rituals : लग्नानंतर महिला चांदीचेच जोडवे का घालतात, सोन्याचे का नाही? हे आहे कारण

हिंदू धर्मातील जवळजवळ सर्व लोकांना हेही माहिती आहे की लग्नानंतर स्त्रिया त्यांच्या पायांतील बोटांत जोडवे घालतात. मात्र यामागचे कारण तुम्हाला माहितीये काय?

साक्षी राऊत

Hindu Rituals : हिंदू धर्मात लग्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्न म्हणजे एक पवित्र नातं. लग्नाची सर्व तयारी अगदी फार पूर्वीपासूनच सुरू होते. अगदी कुंडली जुळेपर्यंत ते मुला-मुलीचे गुण जुळेपर्यंत सगळं बघितल्या जातं. वैवाहिक जीवनात विघ्न येऊ नये म्हणून विद्वान पंडिताचा सल्लाही घेतला जातो. हिंदू धर्मातील जवळजवळ सर्व लोकांना हेही माहिती आहे की लग्नानंतर स्त्रिया त्यांच्या पायांतील बोटांत जोडवे घालतात. मात्र यामागचे कारण तुम्हाला माहितीये काय?

जोडवे घालणे ही प्रथा असली तरी आता फॅशन बनली आहे. विवाहित स्त्रीचे हे सर्वात मोठे लक्षण आहे. वधूच्या श्रृंगाराचा हा महत्वाचा भाग मानला जातो. लग्नानंतर, वधूला जोडवे घालण्यास सांगितले जाते कारण ते सुखी वैवाहिक जीवनाचे लक्षण असते.

ज्योतिष काय सांगतात?

ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी असेही म्हटले आहे की पत्नीने आपल्या पतीशी चांगले संबंध ठेवण्यासाठी, तिने दोन्ही पायांच्या दोन किंवा तीन बोटांमध्ये जोडवे घालावे. जोडवे धारण केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहो, म्हणून चांदीच्या अंगठ्या घालणे फार महत्वाचे आहे. त्याचा संबंध रामायणाशी जोडला जातो. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा तिने आपल्या जवळील वस्तू वाटेत फेकून दिल्या होत्या. भगवान श्रीरामांना सहज शोधता यावं म्हणून त्यांनी हे केलं. (sanskruti)

पायात चांदीचीच जोडवी का घालावी?

महिलांनी मधल्या बोटात जोडवी घालावी. हे बोट थेट हृदयाशी संबंधित आहे. या बोटात चांदीचे जोडवे धारण केल्याने तुमचा चंद्र मजबूत होतो. पती-पत्नीच्या जीवनात शांतता नांदते. तसेच चांदी शरीरासाठी उत्तम धातू मानला जातो. हा धातू नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT