संस्कृती

Vastu Tips : घरातील आरसाही चमकवेल तुमचं नशीब; कोणत्या दिशेला लावायचा पहा

घरामध्ये वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा न कळल्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्राची निर्मिती भगवान ब्रह्मदेवाने मनुष्याच्या कल्याणासाठी केली आहे, असे मानले जाते. आजच्या आधुनिक युगातही लोक घर बांधताना वास्तूचे नियम पाळतात आणि एखाद्या चांगल्या वास्तु तज्ज्ञाच्या सल्ल्याने घर बांधून घेतात. परंतु काहीवेळा सावधगिरी बाळगूनही घरात नकारात्मक ऊर्जा राहते. ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात. तसेच चिंता आणि तणाव निर्माण होतो. वास्तूनुसार घर बांधले जाते, परंतु घरामध्ये वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा न कळल्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. आज आपण घरी आरसा कोणत्या दिशेला असावा हे जाणून घेणार आहोत..

वास्तूनुसार घरामध्ये आरसा लावण्याची योग्य दिशा?

वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, घरात आरसा योग्य दिशेला लावणे खूप महत्वाचे आहे. वास्तूनुसार आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावा. असे मानले जाते की योग्य दिशेला लावलेला आरसा घरात सुख, शांती आणि आर्थिक प्रगती करतो. याशिवाय आरसा योग्य दिशेला ठेवल्याने समाजात घरातील सदस्यांचा मान-सन्मान वाढतो.

वास्तुशास्त्रानुसार आरशाचा आकार किती असावा?

वास्तुशास्त्रानुसार घरातील आरशाचा आकार नेहमी चौकोनी ठेवावा. तसेच घरात बसवलेला आरसा नेहमी स्वच्छ असावा, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा स्पष्ट दिसतो. घरात बसवलेला आरसा घाण होऊ नये आणि धुके पडले असेल तर लगेच बदलणे फायदेशीर आहे हे नेहमी लक्षात ठेवा.

घरामध्ये तुटलेला आरसा नसावा

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, आपण कधीही घरात तुटलेला आरसा ठेवू नये. घरात तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मकता वाढते, असे मानले जाते. हे घरातील सदस्यांसाठीही शुभ नाही. घरात बसवलेला आरसा तुटला किंवा थोडासाही तडा गेला तर तो लगेच बदलायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT