संस्कृती

आदिवासी बांधव कशी साजरी करतात दिवाळी? कसा असतो फराळ?

दिपाली सुसर

आदिवासी बांधवांची वारलींची दिवाळी ही पाडव्याच्या म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशीपासून ते ढोर उठवण्याच्या दिवसापर्यंत साजरी केली जाते. या दिवशी आदिवासी बांधवांकडून त्यांच्या पाळीव जनावरांना रंगवलं जातं. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांना गावाबाहेर नेतात. नंतर मग आखाडयात गवताचा पेंढा पसरलेला असतो. त्यात काही नैसर्गिक जडीबुटी टाकून तो पेटवून त्याच्या धुरातून हे जनावरे गेली की, त्यांचे रोग नाहीसे होतात, अशी त्यांची पारंपरिक समजूत आहे.

दिवाळीत आदिवासी बांधव हिनाय, वाघया, नाराणा देवी आणि गावदेवी या कुलदेवींची मनोभावे पूजा करतात. यामध्ये प्रामुख्याने गावदेवीला मोठा मान असतो. हिरवा खण, नारळ, ऊस, काकडी, बदाम, खारीक, तसंच इतर राणफळे यांचा नैवेद्य दाखवून गावदेवीची पूजा भगताच्या हस्ते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली

पूजा करताना देवीसमोर पणती ठेवून त्याभोवती गोंडयाची फुलं पसरली जातात. गावदेवीला चार पायाचा म्हणजे बोकडाचा किंवा दोन पायाचा म्हणजे कोंबडयाचाही नैवेद्य दाखवला जातो. दिवाळीत आदिवासी पाडयावर गावदेवीची जत्रा भरते. आजुबाजूच्या परिसरातील आदिवासी बांधव एकत्र येऊन जत्रेचा आनंद लुटतात.

आदिवासी बायका पारंपरिक वेशभूषा परिधान करुन एका ताटात तांदूळ पसरून त्यावर बोटाने पाच रेषा काढून ते ताट वृध्दमंडळीकडे सोपावतात. त्याचवेळी मग वृध्दमंडळी देवीकडे गावाच्या कल्याणाचं साकड घालतात.

आदिवासी बांधवांचा दिवाळी फराळ

आदिवासींकडे आपल्यासारखे लाडू, चिवडा, कारंज्या असा फराळ केला जात नाही. तर त्यांच्याकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी देवीला चवळीच्या शेंगांचा आणि काकडी, गूळ आणि तांदळाची भाकरी बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. हाच खरा आदिवासींचा पारंपरिक फराळ असतो.

नंतर मग संध्याकाळी सगळे आदिवासी बांधव एकत्र येऊन वाद्याच्या तालावर नृत्य करतात. आदिवासी महिला पारंपरिक दागिने घालतात. सुंदर अशी पारंपरिक केशभूषा करुन मग त्यांच्यात तारपा नृत्याची स्पर्धा रंगते. सोबतच वृध्द आदिवासी महिला पारंपरिक लोकगिते गातात. अशा रितीने आदिवासी बांधव दिवाळी साजरी करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT