Karashtami Puja Esakal
संस्कृती

Diwali 2022: दिवाळी आलीय हा संदेश देणारी कराष्टमी पूजा, कशी करतात ? जाणून घ्या

कराष्टमी म्हणजे दिवाळीची सुरुवात झाली हा संदेश देणारी पहिली पूजा असते.

दिपाली सुसर

कराष्टमी म्हणजे दिवाळीची सुरुवात झाली हा संदेश देणारी पहिली पूजा असते. शेतातून ज्वारीचे पाच कणसं असलेली धांडे आणले जातात. त्याची तुळशी वृदांवनासमोर खोपडी तयार केली जाते. त्यामध्ये मातीची बोळके ठेवून त्यात धान्य भरले जाते.

त्यामध्ये मातीची बोळके ठेवून त्यात धान्य भरले जाते. मधोमध आपली ग्रामदेवता व लक्ष्मीची मुर्ती ठेवुन पूजेची मांडणी केली जाते. नंतर विड्याच्या पानावर चंदन घेऊन त्यावर चंद्राची कोर काढून त्याची मनोभावे पूजा केली जाते.काही ठिकाणी ज्वारीच्या आंबीलचा, तर काही ठिकाणी खिर-पुरीचा नैवेद्य दाखवला जातो.

प्रांत बदलला की पूजा करायची पद्धत बदलते. काही ठिकाणी तांबे ठेवून त्यात धान्य टाकुन पूजा होते, तर काही ठिकाणी धांडे लावून पूजा होते. मात्र, दोन्हीकडे हेतू एकच असतो आपल्या गुरांढोरांप्रती आदर, धान्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. गावाकडे दूध-दुभते जनावरं भरपूर असतात. दिवाळीच्या वेळी शेतातून धन-धान्याच्या रुपात लक्ष्मी घरी आलेली असते.

शेतकऱ्यांसाठी दूध-दुभते जनावरं म्हणजे धन समृध्दीच. तर पुजेला ठेवलेले धांडे आणि धान्य म्हणजेच लक्ष्मी होय. या गोष्टींची कराष्टमीला पूजा करुन दिवाळीचा पहिला नवा दिवा आज घरात लावला जातो. काही ठिकाणी आठ दिवे लावून देवीची पूजा करतात. माझी आजी सांगते, पूर्वीच्या काळी कराष्टमीपासून गुरेढोरे राखणारी गुराखी मुले संध्याकाळी दिवा घेऊन घरोघरी जायची आणि नागदिवाळीपर्यंत हा क्रम चालू राहायचा.

ज्यावेळी ही मुलं दिवा घरोघरी जायची, त्यावेळी हे लोकगीत गायलं जायचं..."दिन दिन दिवाळीगाई म्हशी ओवाळीगाई म्हशी कुणाच्यालक्षीमनाच्या लक्षीमन कुणाचाआई बापाचा..."गाणी म्हणत मग घरातली बाई त्यांच्या हातातल्या दिव्यात तेल टाकायची आणि 25 पैसे त्यांना दिले जायचे. दिवाळी संपेपर्यंत हा दिवे मिरवायचा सोहळा चालायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: संदीप क्षीरसागरांना गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न? एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा डाव

Pune News : औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीरपणे विक्री; औषध विक्रेत्या संघटनांची बंदी घालण्याची मागणी

Eknath Shinde: विरोधकांच्या विरोधाची हंडी जनतेने फोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शरसंधान

Yermala News : संपूर्ण धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने प्रभावीत झाला असताना राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशी दौरा दुटप्पी पणाचा

Latest Maharashtra News Updates : मुंबईत दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी; केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार, काहींची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT