raksha bandhan festival 2022 sweet dish receipe
raksha bandhan festival 2022 sweet dish receipe 
संस्कृती

Raksha Bandhan : रक्षाबंधनला भावाचं तोंड गोड करणारी 'कलाकंद' रेसिपी, १५ मिनीटांत घरीच बनवा

सकाळ डिजिटल टीम

काही वेळात तयार होणारी आणि अनेकांना आवडणारी कलाकंदची रेसिपी तुम्ही बनवू शकता.

दोन दिवसांवर रक्षाबंधनचा सण आला आहे. भावा-बहिणीच्या नात्याला कायमस्वरूपी गोड आठवणीत बांधून ठेवणारा या सणाला काही गोड पदार्थ तुम्ही घरीच तयार करु शकता. जर तुम्ही वर्किंग महिला असाल तर तुम्हाला वेळेच गणित बऱ्याचवेळा जमत नाही किंवा या सणादिवशी काही पदार्थ करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी झटपट तयार होणारी कलाकंद मिठाई तुम्ही बनवू शकता. (raksha bandhan festival 2022 sweet dish receipe in 14 minutes)

काही वेळात तयार होणारी आणि अनेकांना आवडणारी कलाकंदची रेसिपी तुम्ही बनवू शकता. पनीरपासून तयार होणारी ही मिठाई गोड आणि स्वादिष्ट लागते. याशिवया तुमचे भावांनाही सरप्राईज म्हणून तुम्ही स्वत: घरी तयार केलेली ही मिठाई खायला घालू शकता. तर आज आपण अगदी काही वेळात म्हणजे अवघ्या १५ मिनीटांत तयार होणारी ही कलाकंदची रेसिपी कशी करतात हे पाहणार आहोत.

साहित्य :

  • २५० ग्रॅम पनीर

  • २ मोठे चमचे

  • १ मोठा चमचा मिल्क पावडर

  • अर्धा चमचा इलायची पावडर

  • कापलेले पिस्ताचे तुकडे

  • गुलाबाची पाने

कृती -

  • २५० ग्रॅम पनीरला एकत्र मिक्स करुन वाटून घ्या.

  • यानंतर पॅन गरम करुन त्यात २ मोठे चमचे साखर आणि पनीर टाकून भाजून घ्या.

  • पाच मिनीटांपर्यंत गरम होईपर्यंत या मिश्रणाला भाजून घ्या.

  • आता वरून एक मोठा चमचा मिल्क पावडर टाकून मिश्रण परतत रहा.

  • पाच मिनीटांनंतर या मिश्रणात इलायची पावडर टाकून हलवत रहा.

  • हे सर्व पदार्थ एकमेकांत चांगले एकत्रित झाले की, एका प्लेटमध्ये काढून घ्या.

  • यानंतर या मिश्रणाला वरून कापलेले पिस्ताचे तुकडे आणि गुलाबाच्या पानांनी सजवून घ्या.

  • थंड झाले की हे कलंकद खाण्यासाठी तयार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT