Shree Shivlilamrut Esakal
संस्कृती

Shravan 2022 : श्रावण महिन्यात श्रीशिवलीलामृत सप्ताहाचे पारायण नेमके कसे करावे ?

श्रावण महिण्यांत नियमितपणे शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्हाला भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर श्रावण महिण्यांत नियमितपणे शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.

सप्ताह-पारायण पध्दत कशी असावी ?

कोणत्याही श्रावण सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर अर्पण करावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन " मी शंकराना प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद ( जी मनोकामना असेल ती बोलून ) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे पुढचे 7 दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् श्रीशंकरानी कृपा करून पूर्ण करून घ्यावे." अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शूचिर्भूत असावे.

वारानुसार अध्याय..

सोमवार - अध्याय 1 व अध्याय 2

मंगळवार - अध्याय 3 व अध्याय 4

बुधवार - अध्याय 5 व अध्याय 6

गुरुवार - अध्याय 7 व अध्याय 8

शुक्रवार - अध्याय 9 व अध्याय 10

शनिवार - अध्याय 11 व अध्याय 12

रविवार - अध्याय 13 व अध्याय 14

रविवारी रात्री 15 वा अध्याय वाचला तरी चालेल नाही वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य भगवान शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे.

पारायण करतांना कोणती काळजी घ्यावी ?

1) पारायण करताना देवघरात सतत दिवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ति तांदूळ व पैसे ठेवावेत. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे.

2) पोथी मोठयाने वाचली तरी चालेल. इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. ( जमल्यास रोज जप करावा )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT