Indira Ekadashi Esakal
संस्कृती

Indira Ekadashi 2022: इंदिरा एकादशी दिवशी का करतात शाळीग्रामाची पूजा?

पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सात पिढ्यांपर्यंतचे पितृ तृप्त होतात.

सकाळ डिजिटल टीम

21 सप्टेंबर म्हणजे आज इंदिरा एकादशी आहे. हिंदु धर्मानुसार आजच्या दिवशी भगवान श्रीविष्णूची पूजा आणि उपवास केला जातो. सोबतच गरजू लोकांना दान दिले जाते. या एकादशीला अजून विशेष महत्त्व आहे त्यचे कारण म्हणजे पितृपक्षात येते. श्राद्धाच्या दिवशी श्रीविष्णूची पूजा करून पितरही संतुष्ट होतात, असे शास्त्रात सांगितले आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊ या एकादशीचे महत्त्व, पूजा पद्धती आणि प्रचलित लोककथा काय आहे याविषयीची सविस्तर माहिती..

इंदिरा एकादशीची खास गोष्ट म्हणजे ती पितृपक्षात येते. त्यामुळे याचे महत्त्व वाढते. शास्त्रानुसार या एकादशीला विधिपूर्वक व्रत करून याचे पुण्य पितरांच्या नावाने दान केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि व्रत करणाऱ्याला वैकुंठ प्राप्त होते. पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सात पिढ्यांपर्यंतचे पितृ तृप्त होतात. या एकादशीचे व्रत जो स्वतः करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. इंदिरा एकादशीचे व्रत आणि भगवान श्रीविष्णूची विधिवत पूजा केल्याने वैकुंठधामची प्राप्ती होते. पुराणानुसार जेवढे पुण्य कन्यादानाचे, हजारो वर्षांची तपश्चर्या केल्याचे असते त्याहून अधिक पुण्य केवळ इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने मिळते.

एकादशी व्रत आणि पूजा पद्धत

इंदिरा एकादशीचे व्रत आणि उपासनेची पद्धत इतर एकादशींसारखीच आहे, पण फरक एवढाच आहे की या एकादशीला शाळिग्रामची पूजा केली जाते. या एकादशीच्या दिवशी स्नान करून पवित्र होऊन पूजेचा संकल्प घ्यावा लागतो. संकल्प घेतांना पितरांना या व्रताचे पुण्य देण्याची इच्छा असल्यास संकल्पात तसे म्हणावे लागते. त्यानंतर मग मनोभावे भगवान शाळिग्रामची पूजा केली जाते. भगवान शाळीग्रामाला पंचामृताने अभिषेक केला जातो. या पूजेत अबीर, गुलाल, अक्षत, यज्ञोपवीत, फुले असणे महत्त्वाचे असते. यासोबत तुळशीची पाने जरूर अर्पण करावे. यानंतर भगवान शाळीग्रामाला तुळशीच्या पानांचा नैवेद्य अर्पण करावा.नंतर एकादशीची व्रत कथा वाचून आरती करावी. यानंतर पंचामृत वाटून ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा द्यावी.

आता बघू या एकादशीला कोणत्या गोष्टींचे दान करावे ?

भाद्रपद महिन्यातील एकादशीला तूप, दूध, दही आणि अन्नधान्य दान करण्याचा नियम शास्त्रात सांगितला आहे. या तिथीला गरजू लोकांना अन्नदान केले जाते. असे केल्याने पितर संतुष्ट होतात. या वस्तूंचे दान केल्याने सुख-समृद्धी वाढते. धनप्राप्ती होते आणि आरोग्य चांगले राहते.

इंदिरा एकादशी व्रताची प्रचलित लोककथा काय आहे?

प्राचीन काळी सत्ययुगात महिष्मतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणाने प्रजेचे पालन करत होता. इंद्रसेन राजा पुत्र, पुत्री, नातवंडे, धन, संपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूचा परम भक्त होता. एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाश मार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली. त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले, तेव्हा नारदमुनी म्हणाले की, हे राजन माझे बोलणे तुला चकित करणारे आहे.

एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो. तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले. ते एकादशी व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, पूर्ण जन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकात आलो आहे. यामुळे मुला, माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. नारदमुनींचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबीयांसहित हे व्रत केले. व्रताच्या पुण्य प्रभावाने राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले. त्यानंतर राजा इंद्रसेनही एकादशीच्या व्रत प्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसवून स्वर्गलोकात गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT