Shravan 2022 सकाळ
संस्कृती

Shravan 2022: श्रावण महिन्यात 'या' चार गोष्टी स्वप्नात दिसणे मानले जाते शुभ, जाणून घ्या संकेत

ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात स्वप्नात शिवसंबंधित काही गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की भोलेनाथाची कृपा तुमच्यावर होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवमंदिरात गर्दी असते. शिवभक्त जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि मंत्रोच्चार करून महादेवाची पूजा करतात. ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात स्वप्नात शिवसंबंधित काही गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की भोलेनाथाची कृपा तुमच्यावर होणार आहे. (its a lord shiva blessing if you see these four things in dreams in the month of shravan)

चला जाणून घेऊया श्रावणामध्ये कोणत्या गोष्टी स्वप्नात पाहणे शुभ मानले जाते

नंदीबैल

धार्मिक मान्यतेनुसार नंदी हे शिवाचे गण आणि त्यांचे वाहन मानले जाते. असे म्हणतात की श्रावण महिन्यात स्वप्नात नंदीबैल दिसला तर समजून घ्या की शिवशंकराची तुमच्यावर कृपा असणार. स्वप्नात नंदी दिसणे हे प्रत्येक कामात यश मिळणार असल्याचे लक्षण आहे.

त्रिशूल

त्रिशूल हे रज, तम आणि सत गुणाचेही प्रतीक मानले जाते. त्यांना जोडून भगवान शंकराचा त्रिशूल तयार करण्यात आला अशी मान्यता आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवाच्या त्रिशूलाच्या तीन टोकांना वासना, क्रोध आणि लोभ यांचे कारक मानले जाते. स्वप्नात त्रिशूल दिसणे हे लक्षण आहे की तुमचे सर्व संकट नष्ट होणार आहेत.

डमरू

भगवान शिव नेहमी डमरू हातात घेतात. डमरू हे स्थिरतेचे प्रतीक आहे. स्वप्नात शिवजीचा डमरू पाहणे म्हणजे जीवनातील गोंधळ संपणार असून हे जीवनातील स्थिरतेचे लक्षण आहे.

नाग

शिवजीच्या गळ्यात वासुकी नाग घातला असतो. श्रावण महिन्यात स्वप्नात नाग देवता येणे हे धन वाढीचे लक्षण मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT