Jalabhishek Niyam esakal
संस्कृती

Jalabhishek Niyam : महादेवाला प्रसन्न करायचंय? या दिशेत उभे राहून शिवलिंगावर जलाभिषेक करा

तुम्ही चुकीच्या दिशेला उभे राहून जलाभिषेक केल्यास महादेवाचा कोपही होऊ शकतो. तेव्हा जाणून घ्या जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत

सकाळ डिजिटल टीम

Jalabhishek Niyam : महादेवाला देवांचे देव महादेव असे म्हटले जाते. त्यांचा स्वभाव फार भोळा आहे असे म्हटले जाते. जो कोणी महादेवाची मनोभावे भक्ती करतो त्यांना त्याचे फळ मिळते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जलाभिषेक योग्य दिशेत आणि योग्य ठिकाणी उभे राहून करणेही तेवढेच महत्वाचे असते. तुम्ही चुकीच्या दिशेला उभे राहून जलाभिषेक केल्यास महादेवाचा कोपही होऊ शकतो. तेव्हा जाणून घ्या जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत.

या दिशेत उभे राहून जलाभिषेक करू नका

पुराणात असे म्हटले आहे की महादेवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करताना पूर्व, उत्तर किंवा पश्चिमेकडे तोंड करू नये. याचे कारण म्हणजे भगवान शंकराचे खांदे, पाठ इत्यादी या दिशांना आहेत. या दिशेला तोंड करून जल अर्पण केल्याने कधीही शुभ फळ मिळत नाही.

पूर्व दिशेला उभे राहून जलाभिषेक करू नका

शास्त्रानुसार पूर्वेला शिवाचे (Lord Shiv) मुख्य द्वार आहे. त्यामुळे त्या दिशेला तोंड करून शिवलिंगाला जल अर्पण केल्याने दारात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पूर्व दिशेला तोंड करून कधीही जलाभिषेक करू नये.

जलाभिषेक करण्याची योग्य दिशा कोणती?

धार्मिक विद्वानांच्या मते, शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी दक्षिण दिशा सर्वोत्तम मानली जाते. असे केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच शिवलिंगावर एकाच वेळी जल अर्पण करण्याऐवजी प्रवाहात थोडे थोडे जल अर्पण करा. असे केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीवर भोलेनाथांची कायम कृपा राहाते. (Astrology)

डिस्क्लेमर - वरील लेख पुराणातील माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT