Vaidyanath temple
Vaidyanath temple Esakal
संस्कृती

ज्योतिर्लिंग: 2000 वर्ष जुने असलेले वैद्यनाथ मंदिराचा इतिहास काय आहे?

दिपाली सुसर

परळी येथील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैद्यनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात यादवांचे प्रधान असलेल्या श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुढे पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता असे देखील सांगितले जाते.


वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिराची वास्तु रचना कशी आहे?

हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरुपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या आणि भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वैद्यनाथ इथल्या देवाला स्पर्श करुन दर्शन घेता येते.मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

2000 वर्ष जुना इतिहास असलेले मंदिर:

अशी मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे 2000 वर्षे जुने आहे. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम करण्यासाठी तब्बल18 वर्षे लागली आहेत असे सांगितले जाते.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कहाणी काय आहे ?

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कथा पुराणांवर आधारित आहे, असे म्हणतात की लंकापती रावण, ज्याचे नाव दशानन देखील होते, ते भगवान शिवांचे भक्त होते. त्यांनी बरीच वर्षे भगवान शिव यांची तपश्चर्या केली परंतु भगवान शिव प्रकट न झाल्यामुळे तो आपलं एक-एक शिश कापून अग्नीच्या खड्ड्यात टाकू लागला. असे करता-करता त्याने आपले स्वत: चे 9 डोके कापून घेतले. जेव्हा त्याने दहावं डोकं कापण्यास सुरवात केली, तेव्हा भगवान शिव स्वत: हजर झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. त्यांनी भगवान शिवाला म्हटले की आपण शिवलिंग रुपात माझ्यासह लंकेत राहायला चलावे. भगवान शिवाने हे मान्य केले आणि अशीही अट ठेवली की जर तु या शिवलिंगला जमिनीवर कोठे ठेवले तर मग मी तिथे कायमच स्थापित होईन आणि तेव्हा तिथे रावण त्याच्या स्थितीशी सहमत झाला आणि तो त्या शिवलिंगासह लंकेच्या दिशेने निघाला. पण त्याचवेळी रावणाला लघु शंका निवारण करण्याची गरज भासली आणि अशात त्याने एका मेंढपाळाला जबरदस्तीने शिवलिंग धरण्यास सांगितले. त्याच्या हातात शिवलिंग देऊन रावण मूत्र विसर्जन करण्यासाठी गेला परंतु त्या शिवलिंगाचे वजन त्या मेंढपाळाला सहन झाले नसल्यामुळे त्याने ते तेथेच सोडून दिले आणि निघून गेला. असे म्हटले जाते की तो भेकड भगवान विष्णु स्वत: होते.

ते शिवलिंग उंचावण्यासाठी अनेकदा प्रयत्न करून कंटाळल्यानंतर शेवटी दशानन रावण तिथून परत लंकेत गेला आणि त्यानंतर नारद मुनि व काही ऋषी भगवान शंकराचे वास्तविक रूप पाहण्यासाठी त्या ठिकाणी पोचले. त्याने शिवलिंगाचे नाव वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे ठेवले. म्हणूनच याला वैद्यनाथ ज्योतिर्लिंग असे म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Latest News: उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले दिल्लीत; एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित

कारखानदारांसह सरकारला हादरे देणाऱ्या राजू शेट्टींचं नेमकं चुकलं कुठं? पराभवानंतर शेट्टींवर आत्मचिंतनाची आली वेळ!

Women MP : विदर्भातून ७२ वर्षांत झाल्या केवळ १४ महिला खासदार; भावना गवळी पाचवेळा विजयी

T20 World Cup: अमेरिकेनं पाकिस्तानचा केला गेम... सोशल मीडियावर रंगली चर्चा, मीम्सचाही पडला पाऊस

Google Microsoft Layoffs: असं काय झालं की गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या हजारो कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या, समोर आलंय धक्कादायक कारण

SCROLL FOR NEXT