Kal Bhairav Jayanti esakal
संस्कृती

Kaal Bhairav Jayanti 2022 : कालभैरव जयंतीला करा ही कामे, अकाली मृत्यू अन् ग्रह दोष टळतील

सकाळ डिजिटल टीम

Kaal Bhairav Jayanti : कालभैरव यांना शंकराच रौद्र रुप मानलं जात. कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. यंदा बुधवारी (ता. 16) काल भैरव जयंती आहे. कालभैरव हे शिव शंकराच रौद्र रुप असल्याने ते अत्यंत क्रोधीत असतात, मात्र त्यांची उपासना करणाऱ्या भक्तांसाठी मात्र ते अत्यंत दयाळू असतात. काल भैरवांची भक्ती- भावाने पुजाअर्चा करणाऱ्या भक्तांना त्यांचे आशिर्वाद प्राप्त होतात. चला तर कालभैरव जयंतीला काय करावे ते जाणून घेऊया.

...नाहीतर कालभैरव करतील शिक्षा

कालभैरवाचे रूप अत्यंत क्रोधीत असले तरी ते आपल्या भक्तांप्रती अत्यंत दयाळू आहे. दुष्कृत्य करणाऱ्यांना कालभैरव शिक्षा करतात. असे म्हणतात की जो कोणी कालभैरवांची पूजा करतो तो सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त राहतो. सत्कर्म करणाऱ्यांवर कालभैरवाची कृपा सदैव असते. इतकेच नाही तर काल भैरवाची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. यासोबतच अकाली मृत्यूचा धोका आणि ग्रह दोषांसह कोणत्याही प्रकारचे आजारही टळतात.

हे उपाय करा...

* काल भैरव हे शिव शंकराचे स्वरुप आहेत. त्यामुळे या दिवशी भगवान शंकरांची मोठ्या भक्ती भावाने पुजा करावी.

* शंकराच्या मंदिरात दुधाने अभिषेक करावा.

* कुत्रा हे कालभैरवाचे वाहन मानले जाते. कालभैरव कुत्र्याला खाऊ घातल्याने प्रसन्न होतात. त्यामुळे प्रत्येक कालाष्टमीला कुत्र्याला अन्न द्यावे.

* कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरव चालीसा, कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. या उपायांनी शनि आणि राहूचे वाईट प्रभाव टाळता येतील.

* कालभैरव जयंतीच्या मध्यरात्री चार मुखी दिवा लावावा.

* कालाष्टमीला शेंदूर, तीळाच तेल, नारळ, हरभऱ्याची डाळ गरजवंताला दान करावी.

* कालभैरव जयंतीला हे उपाय केल्याने मनुष्याला काल भैरवांचे आशिर्वाद प्राप्त होतील अन् सर्व दुःख, पापांचा नाश होईल.

माहिती विवेचन - विजय राजेंद्र जोशी (ज्योतिष अभ्यासक, नाशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT