krishna janmashtami 2022 
संस्कृती

Janmashtami : गोकुळ अष्टमीला कृष्णाला 'या' 2 पदार्थांचे नैवेद्य; ट्राय करा सोप्या रेसिपी

यंदा 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा होत असून, यासाठी बाजार सजला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अवघ्या काही दिवसांवर आलेला गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्णजन्मोत्सव सण देशभर आनंदात साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण दिवसभर उपवास करतात आणि श्रीकृष्णाच्या जन्मानंतर रात्री उपवास सोडतात. यंदा 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा होत असून, यासाठी बाजार सजला आहे. या दिवशी देवाला नैवेद्य (भोग) म्हणून घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. यापैकी 2 पाककृती तुम्ही ट्राय करु शकता..

पंजिरी कशी तयार करावी?

पंजिरी तयार करण्यासाठी तुम्हाला १ कप धणे, १/२ कप साखर पावडर, १/२ कप बारीक चिरलेले बदाम, १/२ कप बारीक चिरलेले काजू, १ टेबलस्पून बेदाणे, १/२ कप किसलेले खोबरे, २ मोठे चमचे तूप, १/२ कप मखना आणि १/२ टीस्पून वेलची पावडर आवश्यक आहे, असे साहित्य असेल तर तुम्ही सहजरित्या पंजिरी तयार करु शकता.

कृती -

सर्व प्रथम कढईत तूप गरम करून घ्या. यानंतर त्यात चिरलेले काजू आणि बदाम घालून चांगले परतून घ्या. यानंतर ते पॅनमधून बाहेर काढा. नंतर त्याच कढईत मखाना तळून घ्या. यानंतर मखाना बाहेर काढून घ्या. आता पॅनमध्ये तूप घालून त्यात धणे पावडर 10 मिनिटे चांगली परतून घ्या. ही पावडर भाजली की गॅस बंद करा. आता यात भाजलेले मखाना, काजू, बदाम, बेदाणे, वेलची पावडर आणि साखर पावडर घालून एकत्र करा. नंतर मंद आचेवर ठेवा आणि हे मिश्रण हलवत रहा. नंतर 2 मिनिटांनी गॅस बंद करा. गरमा गरम पंजिरी खायला तयार आहे.

खोबऱ्याचे लाडू कसे बनवावे?

हे करण्यासाठी तुम्हाला २ वाट्या किसलेले खोबरे, १ वाटी दूध, वाटी साखर, वाटी मिल्क पावडर, २ चमचे बारीक चिरलेले काजू, टीस्पून वेलची पावडर, १ टेबलस्पून तूप लागेल असे साहित्य लागेल.

कृती -

सुरुवातीला कढईत तूप टाकून खोबरे चांगले परतून घ्या. ते चांगले भाजल्यावर त्यात साखर आणि वेलची पूड घालून एकत्र करा. यानंतर त्यात काजू आणि मिल्क पावडर मिक्स करा. सर्व साहित्य एकत्र करून गॅसवर १ ते २ मिनिटे शिजवून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर गोल गोल लाडू बनवून तयार करा. हे कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT