Govind Ladoo  Esakal
संस्कृती

Krishna Janmashtami: पारंपरिक पद्धतीने गोविंद लाडू कसे तयार करायचे?

हिंदू परंपरेनुसार, जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.

दिपाली सुसर

हिंदू परंपरेनुसार, जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 19 ऑगस्ट 2022 रोजी जन्माष्टमीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2022 रोजी दहीहंडी (Dahi Handi) उत्सवाचे आयोजन केले जाईल. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचा एक भाग मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. चला तर मग आज आपण बघू या पारंपरिक गोविंद लाडू कसे तयार करायचे ?

साहित्य:

1) दोन वाटी पोहे

2) एक वाटी भाजलेले शेंगदाणे

3) दिड वाटी खिसलेले खोबरे

4) एक वाटी खिसलेला गूळ

5) एक टेबलस्पून जायफळ पूड

6) एक टेबलस्पून तूप

7) काजू, बदाम, मनुके

8) 1 चमचा खसखस

कृती:

सर्वप्रथम कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यावे.

शेंगदाणे भाजून झाले की एका ताटात काढून घ्यावे.

आता कढईमध्ये पोहे भाजून घेऊन ते ही काढून घ्यावे आणि खिसलेले खोबरे भाजून घ्यावे. ते ही भाजून झाले कि काढून घ्या.कढई मध्ये तूप घालावे आणि ड्रायफ्रूट्स तळून घ्या व खसखस परतून घ्यावे.आता पोहे मिक्सरला बारीक करा, शेंगदाणे बारीक करून घ्या आणि काजू बदाम मनुके असे सर्व साहित्य मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्या आणि एका बाउल मध्ये काढा. त्यात खिसलेला गूळ घाला, वेलदोडे जायफळ पूड घाला आणि तूप घाला. हे सर्व मिश्रण एकजीव झाले की मग त्यांचे मस्त लाडू तयार करुन घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT