संस्कृती

Shravan Somvar : आज शेवटच्या श्रावण सोमवारला जुळून येतोय खास योग, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा खास उपाय

शेवटच्या श्रावण सोमवारला महादेवाला प्रसन्न करण्यासाठीचे काही खास उपाय जाणून घेऊयात

सकाळ ऑनलाईन टीम

Shravan Somvar 2023 : श्रावण सोमवारला विशेष महत्व असून यंदा श्रावण अधिक मासाचे चार आणि श्रावणातील चार असे एकूण आठ सोमवार आलेत. आज श्रावण महिन्यातील चौथा म्हणजेच शेवटचा सोमवार. श्रावण सोमवारचे व्रत केल्याने भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होताता अशी मान्यता आहे. चला तर शेवटच्या श्रावण सोमवारला महादेवाला प्रसन्न करण्यासाठीचे काही खास उपाय जाणून घेऊयात.

श्रावण महिन्यात महादेवाची भक्तांवर विशेष कृपा असते. आज शेवटचा श्रावण सोमवार असल्याने या महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठीचा हा शेवटचा सोमवार असणार आहे.

श्रावणातील शेवटच्या सोमवारी अशी करा महादेवाची पूजा

आज सकाळी आंघोळ करून महादेवाच्या पूजेसाठीचा संकल्प घ्यावा.

पंचांगानुसार दिलेल्या शुभमुहूर्तावर शिवमंदिरात जाऊन किंवा घरीच शिवलिंगाची पूजा करा.

पूजा झाल्यावर शंकराच्या पिंडीवर गंगाजल आणि दुधाचा अभिषेक करा.

महादेवाला चंदन, पांढरी फुले, बेलपत्र, धोतरा, भस्म आणि फुलांची माळ अर्पण करा.

याशिवाय मध, फळे, मिठाई, साखर, धूप आणि दिवा अर्पण करा.

नंतर शिव चालिसा आणि सोमवार व्रत कथा पाठ करा.

सगळ्यात शेवटी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून शंकराची आरती करावी.

शेवटच्या श्रावण सोमवारी जुळून येतोय खास योग

शेवटच्या श्रावण सोमवारी म्हणजे आज पुष्य नक्षत्र ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत राहील. या दिवशी परिघ योग निर्माण होत असून हा योग रात्री १२ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी या योग शुभ आहे असे म्हटले जाते. शिवाय कौलव करण १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत राहील.

शिवामूठ

आज श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी जव शिवामूठ वाहावी. शिवामूठ वाहताना ॐ नमः शिवाय। हा मंत्र म्हणावा

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

Latest Marathi News Live Update: ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एक कोटींची फसवणूक

KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

"दोनशे लोकांचं जेवण आणि घाईघाईत बुकिंग", 'सीजेपी'च्या व्हायरल व्हिडीओवर हॉटेल व्यवस्थापनाची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT