Laxmi Pujan 2022 Esakal
संस्कृती

Laxmi Pujan 2022: यंदा लक्ष्मीपूजन साजरे करतांना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मातील दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा आहे. लक्ष्मीपूजन आश्विन अमावास्येला म्हणजेच दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर मुहूर्तावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरात श्रीसूक्त पाठही केले जाते. तसेच व्यापारी लोक आपल्या हिशोबाचे पुस्तक याची सुद्धा पूजा करतात तसेच येथून नवीन वर्ष लक्ष्मी पूजनापासून सुरू होते.

यंदा कधी आहे लक्ष्मीपूजन ?

आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते. यंदा लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर रोजी साजरे केले जाणार आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. 

लक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील स्त्रिया मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवे लावून सर्व स्त्रिया मुले आनंदी असतात व त्या दिवशी दिपोत्सव साजरा केला जातो व लक्ष्मीचे पूजन करतात. एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून किंवा झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या ठेवून अक्षदांचे स्वस्तिक काढतात. या श्री लक्ष्मी व श्री कुबेराची मूर्ती यांची मनोभावाने पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. तर कुबेर हा संपत्ती रक्षक आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करावे?

दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे. दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.

लक्ष्मीपूजनाचे काही नियम

1) लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या कधीही ठेवू नका.

2) लक्ष्मीपूजनावेळी केवळ लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करू नका.

3) लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी.

 4) लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. 

5) दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते. 

6) पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा प्रतिमा उत्तर दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT