Diwali 2022 esakal
संस्कृती

Diwali 2022: या मंदिरात भक्त चिट्ठ्या लिहून मागणं घालतात, लक्ष्मी माता करते सर्व इच्छा पूर्ण

या मंदिरात भक्तांच्या कागदावर मातेला लिहून पाठवलेल्या इच्छा पूर्ण होतात असे मानल्या जाते

सकाळ डिजिटल टीम

Temple: दिवाळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. या सणाला माता लक्ष्मी आणि गणेशजीची पूजा केली जाते. मात्र भारतात एक असं मंदिर आहे जेथे माता लक्ष्मीला मंदिरात चिट्ठी लिहून लोक त्यांच्या इच्छा प्रकट करतात. भक्तांच्या कागदावर मातेला लिहून पाठवलेल्या इच्छा पूर्ण होतात असे मानल्या जाते. (Diwali)

मंदिराला ४८० वर्ष जुना इतिहास

राजस्थानच्या बांसवाडा शहरात 480 वर्षे जुने मंदिर आहे. इथे पत्र लिहून मातेकडून जे काही मागितले जाते ते माता नक्कीच पूर्ण करते, अशी लोकांची श्रद्धा आहे. या मंदिरात जे भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात, तेही दानपेटीत पत्र टाकून जातात. पत्रात ते त्यांची इच्छा लिहून ठेवतात. महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांची पत्रे ठेवली जातात. श्राद्ध पक्षातील अष्टमीच्या दिवशी आईचा वाढदिवस साजरा केला जातो. याच दिवशी वसंत पंचमीही साजरी केली जाते. या दिवशी भक्ताची पत्रे उघडली जातात. येथे पत्रे फक्त दोन ते तीन वर्षे ठेवली जातात, त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते.

पांढऱ्या रंगाच्या मार्बलने बनवले गेलेय मंदिर

मंदिरात स्थापित केलेली मातेची मूर्ती पांढऱ्या संगमरवरी दगडाची आहे. मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे. येथे माता लक्ष्मी 16 दलांच्या कमळाच्या आसनावर विराजमान आहे. मंदिरातील पंडित सांगतात की, जर तुम्ही मंदिरात येऊन आईची पूजा केली तर आईचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो.

मातेचा श्रृंगार केल्या जातो

दर दिवाळीला महालक्ष्मीची मूर्ती साडेपाच किलो चांदीच्या कपड्यांनी सजवली जाते. याशिवाय मातेला सोन्याचा हार, अंगठी, नथ यांनी सजवले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मंदिराच्या रक्षणासाठी एकही गार्ड ठेवण्यात आलेला नाही. दिवाळीनिमित्त येथे भाविकांची गर्दी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT